नागपुर : राज्यात मागील काही दिवसापासून राज्यातील प्रमुख नेत्यांवर हल्ला करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मुंबईत मनसेचे संदीप देशपांडे यांच्यावर मार्निंग वॉकला गेले असता, त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुर येथील निवासस्थानी एका अज्ञात व्यक्तींनी बाॅम्ब ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेही वाचा…आपला शैक्षणिक दर्जा काय, कर्तृत्व काय ? म्हणत काॅंग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, त्यात ‘मामू’ही केला उल्लेख
रात्री दोन वाजच्या सुमारास कनाल परिसरातून पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये एक फोन आला. त्या फोनमधून नागपुर येथील खाजगी निवासस्थानी बाॅम्ब ठेवल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर सीतापडी पोलीस स्टेशन या संपुर्ण प्रकरणाची कसून चौकशी केली. त्याठिकाणी बॉम्ब सदृश्य कोणतीही परिस्थिती त्याठिकाणी आढलेली नाही. त्यानंतर पोलिसांनी कॉल ट्रेस केला.
हेही वाचा…“तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारतील का?” एकनाथ शिंदेंचा सवाल
ज्या फोनवरून बॉम्ब बाबत सांगण्यात आलं. त्याचा फोन ट्रेस करून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. कनाल परिसरात राहणारा एक व्यक्ती आहे. त्याच्या घरची वीज गेल्याने त्याने रागाने पोलिसांना फोन करून फडणवीसांच्या घरात बॉम्ब असल्याचं सांगितलं. त्यानंतर त्याची कामठी पोलिस ठाण्यात पोलिसांकडून कसून चौकशी केली जात आहे.
Read also
हेही वाचा…संजय शिरसाठ यांच्याविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार, म्हणाल्या की, “संजय शिरसाठ या विकृत आमदाराने..”
हेही वाचा…“नेतेच चमडी बचाव पवित्र्यात राहिले तर, रंगा बिल्ला यांच्या तावडीतून लोकशाही कोणीही वाचवू शकणार नाही”
हेही वाचा…“नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, की..”, सुषमा अंधारेंनी ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत भाजपला हाणला खोचक टोला
हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा