मुंबई : राज्यात एव्हाना देशात काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर केलेल्या कारवाईचा निषेध म्हणून काॅंग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत. तर दुसऱ्या बाजूला सावरकरांचा सातत्याने अपमान केल्याने भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच आज पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर टिका केली.
हेही वाचा…“कुत्रं भुकल्याशिवाय मालक भाकर टाकतं नाही, तसं पडळकरांचं..” राष्ट्रवादीची पडळकरांवर जहरी टिका
एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांचा एक जुना फोटो दाखविला. सावरकरांचा अपमान केल्याप्रकरणी बाळासाहेबांनी मणिशंकर अय्यर यांच्या फोटोला चपलीने मारलं होतं. अन् तोच फोटो आजच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवला. त्यावरून त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक सवाल केलेत.
हेही वाचा…“तर उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची हिमंत दाखवावी,” भाजपचं चॅलेंज
बाळासाहेब ठाकरे यांनी मणिशंकर अय्यर यांच्या थोबाडीत मारली होती. तुम्ही राहुल गांधी यांच्या थोबाडात मारणार का ? असं आव्हान एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केलं आहे. तसेच राहुल गांधी सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल बोलून अवमान केला आहे. सावरकर यांच्यावर तुमची बोलण्याची लायकी सुद्दा नाही म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केला.
Read also
- हेही वाचा…“नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, की..”, सुषमा अंधारेंनी ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत भाजपला हाणला खोचक टोला
- हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
- हेही वाचा…आपला शैक्षणिक दर्जा काय, कर्तृत्व काय ? म्हणत काॅंग्रेसने शिंदेंचा ‘तो’ व्हिडीओ केला ट्विट, त्यात ‘मामू’ही केला उल्लेख
- हेही वाचा…“तर उद्धव ठाकरे राहुल गांधींच्या थोबाडात मारतील का?” एकनाथ शिंदेंचा सवाल
- हेही वाचा…“एकदा तरी ठाकरी बाणा दाखवा अन् काॅंग्रेसची पक्षाची साथ सोडा”