मुंबई : शिवसेनेचे उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आपल्या जाहीर सभांमधून शिंदे गटातील आमदारांवर तुटून पडत आहेत. अनेकदा सुषमा अंधारे शिंदे गटातील नेत्यांवर कडाडून टिका करतांना दिसत आहेत. त्याला शिंदे गटाच्या आमदारांकडूनही सुषमा अंधारे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. यातच शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी अंधारे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टिका केली आहे. त्यामुळे सुषमा अंधारे यांनी संजय शिरसाठी यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी संजय शिरसाठ यांच्यावर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…““एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषेदत दाखवला बाळासाहेबांचा ‘तो’ जुना फोटो,” उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
रूपाली पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट लिहून संजय शिरसाठ यांच्यावर निशाणा साधला आहे. रूपाली पाटील यांनी या पोस्टमध्ये संजय शिरसाठ यांना काही प्रश्नही केले आहेत. यात त्या म्हणाल्या की, संजय शिरसाट हे एका व्यक्तीचे नाव नाही तर प्रवृत्तीचे नाव आहे जी विकृत प्रवृत्ती कायम महिलांना पैर की जूती समजते. सुषमाताई अंधारे या प्रत्येकाशी बोलत असताना भाऊ दादा अशी संबोधने लावतात. कारण त्या एका चांगल्या घरातून आणि चांगल्या संस्कारातून आलेल्या आहेत. त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या कुटुंबाचे आणि त्यांच्या पक्ष नेतृत्वाचे अत्यंत सभ्य आणि सुसंस्कृत संस्कार दिसतात. ज्याची सध्या पातळी घसरलेल्या राजकारणात वाणवा आहे.
हेही वाचा…“नमो भक्तों का हाल कुछ इस तरह से है, की..”, सुषमा अंधारेंनी ‘तो’ व्हिडीओ ट्विट करत भाजपला हाणला खोचक टोला
याउलट संजय शिरसाट आत्ता जिथे आहेत, तिथे असणारे पुरुष राजकारणी हे कायम महिलांबद्दल अत्यंत असभ्य भाषेत बोलतात. मग ते अब्दुल सत्तार असतील किंवा गुलाब पाटील असतील . तर तिथे असणाऱ्या महिला या कायम नंगट, हरामखोर, थोबडवून काढीन, सटवी, चपलाने मारेल, दांडा, ढुं* अशी गलिच्छ भाषा आणि शब्दप्रयोग करतात. त्यामुळे शिरसाट यांना चांगलं बोलायची आणि चांगलं ऐकायची मुळात सवयच नाही. शिरसाट जेव्हा लफड्यांची वगैरे भाषा वापरतात तेव्हा ते त्यांची वैचारिक लायकी काय आहे हे जगाला दाखवतात. शिरसाट यांची संभाजीनगर मधली ख्याती अशी आहे की शिरसाठ यांना कोणीही घरात निमंत्रण देत नाही कारण शिरसाटांची नजर इतकी पाप वाचणे भरलेली असते की घरातल्या लेकी बाळींना शिरसाठानी भेटावे असे कुणालाही वाटत नाही. मुळात शिरसाटानी स्वतःच्या अंतरंगात जरा डोकावून बघावे आणि काही प्रश्नांची उत्तरे द्यावी .
हेही वाचा…“राहुल गांधींच्या निषेधार्थ राज्यात ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढणार”, शिंदे अन् फडणवीसांची घोषणा
१) संभाजीनगर मध्ये पाटील नावाच्या व्यक्तीला संजय शिरसाट का बर अडकवू पाहत होते ? या पाटीलचा काय संबंध होता म्हणून संजय शिरसाट हे आपली सगळी ताकद पणाला लावत होते?
२) व्हाया सुरत गुवाहाटी टूर करणाऱ्या संजय शिरसाटाकडे 72 कोटी रुपयांची रक्कम घरी कशी काय आली ? या ७२ कोटी रुपयांतून शिरसाठ यांना ब्लॅकमेल करत पाच कोटी रुपये मागणारी त्यांच्या जीवाभावाची बाई कोण होती?
3) अगदी आठच दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईमध्ये ७२व्या मजल्यावर संजय शिरसाटानी कुणासाठी कोट्यावधीचा फ्लॅट घेतला ज्याची त्यांनी सत्यनारायण पूजा करण्यासाठी काही पत्रकारांनाही आमंत्रित केले होते.
4) दोन अडीच महिन्यापूर्वी संजय शिरसाट यांना अचानक हार्ट अटॅक आल्याने एअर ॲम्बुलन्स ने संभाजीनगर वरून मुंबईला नेण्याचे फार मोठे नाटक झाले हे अटॅक प्रकरण नेमके काय होते ?
शिरसाट आमचं तोंड उघडायला लावू नका आणि आता शेवटचा प्रश्न सुषमाताई अंधारे या रामा इंटरनॅशनल ला उतरतात की ताज हॉटेल ला उतरतात ही ओबेराय हॉटेलला उतरतात की त्या लाखो शिवसैनिकांच्या लेक आणि बहीण म्हणून त्यांच्या काळीज कप्प्यात राहतात हा मिंदे गटातल्या गद्दारांचा प्रश्न असू शकत नाही. त्यांच्या राहण्या खाण्याची काळजी आणि खर्च करण्यासाठी त्यांचा पक्ष अत्यंत खंबीर आहे मिंधे गटातल्या गद्दारांनी फार फार तर खोक्यांमधून मिळालेल्या पैशांनी गुवाहाटीच्या सहली कराव्यात आणि आयत्या पिठावर रेगोटे उडत लोकांच्या कष्टाच्या घामातून मिळालेल्या पैशावर ऐश करत काय झाडी काय डोंगर काय हॉटेल असे म्हणत बसावे. शिरसाट हा तुम्हाला अत्यंत आपुलकीचा सल्ला वजा इशारा आहे. सुषमाताई अंधारे यांच्यासारख्या कायद्याने चालणाऱ्या आणि शून्यातून स्वतःचे ओळख उभी करू पाहणाऱ्या महिलेला एकाकी समजून जर तुम्ही गलिच्छ पद्धतीने वार करण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा गाठ महाराष्ट्रातल्या तमाम जिजाऊ सावित्रीच्या लेकींशी आहे. असंही त्या म्हणाल्यात.
Read also
हेही वाचा…“वज्रमूठ महाविकास आघाडीची..! आघाडीच्या पहिल्या सभेचा थरकाप उडवणारा टिझर जारी, राजकारण तापणार ?
हेही वाचा…““आई आजारी होती तरी ती सगळ्या कार्यक्रमांना जात होती”, कुणाल टिळकांनी दाखवला चंद्रकांत पाटलांना ‘ग्राउंड रिझल्ट’
हेही वाचा…““फडणवीसांच्या खासगी निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याचा पोलिसांना फोन, आरोपी ताब्यात, कारण आलं समोर”
हेही वाचा…संजय शिरसाठ यांच्याविरोधात सुषमा अंधारेंची महिला आयोगाकडे तक्रार, म्हणाल्या की, “संजय शिरसाठ या विकृत आमदाराने..”
हेही वाचा…“नेतेच चमडी बचाव पवित्र्यात राहिले तर, रंगा बिल्ला यांच्या तावडीतून लोकशाही कोणीही वाचवू शकणार नाही”