मुंबई : गोरेगाव पत्राचाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अजूनही दिलासा मिळाला नाही. त्यांची आज न्यायालयीन कोठडी संपली असून त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचा यंदाचा दसरा मेळावा ते तुरूंगातूनच बघण्याची शक्यता आहे.
“पवार साहेबांच्या बरोबरीने नेतृत्व करायला निघालोय”; शहाजी बापू पाटील
संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी करण्यात आली. इडीने संजय राऊतांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध दर्शविला. त्यामुळे न्यायालयाने त्यांच्या न्यायालयीन कोठडीत येत्या 10 ऑक्टोंबर पर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे 5 ऑक्टोंबरला शिवाजी पार्क येथील दसरा मेळावा ते तुरूंगातूनच बघण्याची शक्यता आहे.
सोसायटीधारकांच्या समस्या हे राष्ट्रवादीचे अपयश : एकनाथ पवार
संजय राऊत यांना गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपाखाली अटक केली. इडीच्या म्हणण्यानुसार, म्हाडाचा भूखंड असलेली पत्राचाळ विकसित करण्याचे काम संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्श्न कंपनीला देण्यात आले होते. मात्र प्रवीण राऊत यांनी पत्राचाळीतील रहिवाशांची फसवणुक करून काही भूखंड खासगी विकासकाला विकला.
Read also
- “ठाकरे शैलीमुळे विरोधकांना दणका, काही जणांना बाम लावण्याची वेळ”
- संत गाडगेबाबांची दशसुत्री नव्याने लावली पण ठाकरेंची सही गायब…! नव्या सरकारचं चाललंय काय..?
- गोव्यातून बाटली घेऊन येणाऱ्याला मोक्का, अन् आमदार घेऊन येणाऱ्याला खोक्का; ऱाष्ट्रवादीने डिवचलं
- आई भवानी…! आपला महाराष्ट्र चिंतामुक्त कर..; देवेंद्र फडणवीस
- “आमचच नाणं खणखणीत, म्हणून जो उठतोय तो आमच्याच विरोधात बोलतोय”; सुप्रिया सुळे