मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या काही वक्तव्यामुळे भाजप आणि शिवसेना लांब गेली आहे. तसेच आमच्यामुळे तुम्ही राज्यसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्याबाबत तुम्हाला कोणाताही अधिकार नाही. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच भाजपसोबत जाण्याचा निर्णय घ्यावा, असं म्हणत बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी शिवसेनेला निर्णय घेण्याचा आता अल्टिमेटम दिला आहे.
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं; बंडखोर आमदार दिपक केसरकर
शिवसेना पक्ष प्रमुख यांना बंडखोर आमदारांपैकी कुणाचाही विरोध नाही किंवा त्यांच्याबद्दल कोणतेही मतभेद नाहीत. मात्र महाविकास आघाडीमधून शिवसेनेने बाहेर पडावे हीच सर्वांची इच्छा आहे. याकरीता उद्धव ठाकरे यांनी तयारी दर्शवली तरी आज बंडखोर आमदार आज महाराष्ट्रात परत येतील आणि त्यांच्या आशीर्वाने सत्तेची समीकरणे बदलावतीत हीच सर्वांचीच इच्छा आहे. मात्र आता निर्णय घेण्याची वेळ आली असून कदाचित हे शेवटचे आवाहन असल्याचे दिपक केसरकर यांनी सांगितले आहे.
“राज्य सरकारचा पाठिंबा कोर्टात नाही तर राज्यपालांकडे जाऊन सांगायचा असतो”; जयत पाटलांचा शिंदेंना टोला
प्रेतांच्या जीवावर निवडून आला असाल तर राजीनामा द्या, आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार कुणालाही नाही. जर हिमंत असेल तर तुम्ही जनतेमधून निवडून दाखवा. आम्ही महाराष्ट्रातील जनतेमधून निवडून आलो आहे. त्यामुळे आमच्यावर बोलण्याचा तुम्हाला कोणताही अधिकार नाही. असंही दिपक केसरकर म्हणाले. बंडखोर आमदार हे पक्षाची गद्दार असल्याचे सांगून काही नेत्यांकडून मतभेद वाढवले जात असल्याचे दिपक केसरकर म्हणाले आहे.
“राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावुन आलं पाहिजे”; रूपाली पाटील
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी नंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या बैठका सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात बोलताना राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 116 आमदारांचं बळ असून ते विरोधी पक्षाची भूमिका सक्षमपणे सांभाळत आहेत. इतका मोठा विरोधी पक्ष महाराष्ट्रात निर्माण झाला नव्हता. त्यामुळे हा विरोधी पक्ष चांगले विधायक कामे करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. असंही राऊत म्हणाले.
Read als
- ‘शिंदे साहेब सोडून जाऊ नका, आम्ही उद्धव साहेबांना समजावून सांगतो’
- “महाराष्ट्रातील १४४ चा आकडा गाठण्यासाठी भाजपाने आसाममध्ये १२६ जणांकडे दुर्लक्ष केले”
- “बेडकाच्या डबक्यात भाजपने उतरू नये, नाहीतर फडणवीस, मोदींची अप्रतिष्ठा होईल”
- “कारकुनच्या पदावरून उचलून राजसाहेबांनी सामानाचा संपादक बनवला”; मनसेचा राऊतांना टोला
- “मनसे हा पक्ष नसून डिपॉझिट जप्तची मशिन”; दिपाली सय्यद यांनी मनसेला पुन्हा डिवचलं