संगमनेर: अहमदनगर जिल्ह्यातील अनेक दुष्काळी भागांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यांच्या कामांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली आहे. निळवंडे धरणासाठी थोरातांनी निधीची तरतूद केल्यामुळे कालव्यांच्या कामांना गती मिळाली आहे. निळवंडेच्या डाव्या कालव्याची ६४ ते ७० किलोमीटर लांबीची पाहणी आज महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. कोठे कमळेशवर, काथरवाडी, लोहारे मेंढवणं या परिसरात विविध ठिकाणच्या कामाची पाहणी करत त्यांनी कामाचा आढावा घेतला आहे.
हे पण वाचा “निळवंडे धरणाच्या कामाला एकही रुपया कमी पडू देणार नाही” जलसंपदा मंत्री जयंत पाटील
लोहारे, कासारे या गावांमधील विविध ठिकाणच्या कालव्याची पाहणी करत असताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अंतिम स्वरूपाच्या कामांसाठी सूचना केल्या आहेत. निळवंडे धरणाचे काम योग्यरीत्या पूर्ण करून दुष्काळी भागाला पाणी मिळवून देणे आपल्या जीवनाचा ध्यास असल्याचे त्यांनी म्हटले आहे. २०२२ मधील पावसाळ्यात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे या भागाला आणून देण्यासाठी आपण पूर्ण प्रयत्नशील असून त्यादृष्टीने काम देखील अत्यंत जोरात चालू आहे. २०१४ पर्यंत आपण धरणाचे काम पूर्ण करून पिंपळगाव कोंझिरा, गणेशवाडी हे मोठे बोगदे मार्गी लावले होते.
हे पण वाचा, शिर्डीचे शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल
हे पण वाचा, नगरच्या महापौर पदाच्या दावेदार रोहिणी शेंडगे यांचा मार्ग सुकर; रिता शैलेश भाकरेंची बिनशर्त माघार
हे पण वाचा, अहमदनगरच्या महापौर पदासाठी शिवसेना खासदार सुजय विखेंच्या दारी
गेल्या काही वर्षांमध्ये धरणाचे काम थांबले होते. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर २०१९ मध्ये मी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि दुसऱ्याच दिवशी निळवंडेच्या कामाची बैठक घेऊन कामाला गती दिली. ज्या प्रकल्पावर अवघे दोन जेसीबी कार्यरत होते त्याठिकाणी आज ३५ जेसीबी कार्यरत आहेत. कोरोना महामारीच्या संकटकाळात रात्रंदिवस काम सुरु आहे. उर्वरित कामे तातडीने पूर्ण करून या भागात निळवंडेचे पाणी येईल तो क्षण जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असेल असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. बाळासाहेब थोरात यांच्याच हातातून हे काम व्हावे अशी नियतीची इच्छाच होती असे आमदार. डॉ. सुधीर तांबे यांनी म्हटले आहे.
हे पण वाचा, कुकडी सल्लागार समितीच्या पदावरून घनश्याम शेलार यांची हकालपट्टी करा; सरपंच काकासाहेब धांडे यांची मागणी
हे पण वाचा, राहुरी तालुक्यासाठी महाविकास आघाडीतील मामा-भाचे वापरणार आपले ‘राजकीय’ वजन
हे पण वाचा, अजित पवार-छत्रपती शाहूंची लक्षवेधी भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
हे पण वाचा, नागपूर: राष्ट्रवादीचा कारभार मोठा असल्याने समन्वयाचा अभाव; मात्र, गटबाजी नाही