अहमदरनगर : संभाजीराजे छत्रपती आज (शनिवारी) कोपर्डीत येणार आहेत. कोपर्डी ते बलात्कार प्रकरणातील पीडित कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर संभाजीराजे यांच्याकडून मराठा आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट होईल, अशी शक्यता आहे. साधारण दुपारी दोनच्या सुमारास संभाजीराजे कोपर्डीत दाखल होतील. त्यांच्या या दौऱ्याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.
संभाजीराजे यांनी शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. कोल्हापुरात १६ जूनला हा मोर्चा निघेल, असे त्यांनी सांगितले होते. मात्र, आता संभाजीराजे पुण्यातून लाँग मार्च काढण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे १६ जून रोजीच्या कोल्हापुरातील मोर्चावर अनिश्चिततेचे सावट आहे. काही दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, त्यामधून फार काही हाती लागले नव्हते. त्यामुळे आता संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात शुक्रवारी नियोजित असलेली बैठक आता लांबणीवर पडली होती.
मात्र, उदयनराजे भोसले यांनी आपण लवकरच संभाजीराजे यांना भेटणार असल्याचे स्पष्ट केले आहे. काही पूर्वनियोजित गोष्टींमुळे मला ही भेट लांबणीवर टाकावी लागली. कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. संभाजीराजे आणि मी भाऊ आहोत. मी प्रत्येक कार्यात त्यांच्यासोबत आहे. माझी कामं आटोपल्यानंतर दोन-तीन दिवसांत मी संभाजीराजे यांना भेटेने, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले होते.
Read Also :
- ‘नागरिकांसोबत मग्रुरी अजिबात खपवून घेतली जाणार नाही’
- ‘अजितदादा म्हणतात कोण लाल आहे जो सरकार पाडेल, मी म्हणतो तो लाल अजित पवारच आहेत’
- मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत महायुतीचे नेतेही पंतप्रधान मोदींना भेटणार
- ‘चंद्रकांत पाटलांना उत्तर देणे मी रास्त समजत नाही, फडणवीस बोलल्यावर बघू’
- ‘भाजपमध्ये गेलेले नेते पुन्हा काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक, पण…’