मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजप खासदार किरीट सोमय्या यांच्यातील संघर्ष अधिक वाढण्याची शक्यता आहे. कारण संजय राऊतांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. मात्र या आरोपांबाबत कुठलेही पुरावे सादर न केल्याने मेधा सोमय्या या राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
राऊतांविरोधात सोमय्या कुटुंबीयांनी नुकतीच पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक भ्रष्टाचाराचे आरोप आणि विधाने केली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पण पोलिसांकडून या तक्रारींवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यानंतर आता मेधा सोमय्या न्यायालयात अर्ज सादर करणार आहे. येत्या १८ मे रोजी मुंबईतील शिवडी येथील न्यायालयात राऊतांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला जाणार आहे. एका महिलेवर दबाव टाकण्यासाठी शंभर कोटींच्या शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. त्यांच्याकडे याचा एकही पुरावा नाही. त्यामुळे न्यायालयात जाणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
“देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे”
मेधा सोमय्या यांनी याबाबतचा तक्रार अर्ज मुंलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. राऊतांवर त्यांनी धमकावण्याचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम ५०३, ५०६ आणि ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. राऊत यांनी माध्यमांमध्ये दुर्भाग्यपूर्ण आणि अयोग्य विधाने केली आहे. त्यांनी केवळ आपले चारित्र्यहनन केले नाही तर मला धमकावलंही, असे तक्रार अर्जात म्हटले आहे.
Read also:
- ‘ओ खैरे व्हा आता बहिरे’; कारण मुख्यमंत्री म्हणाले, औरंगाबादचे नाव संभाजीनगर करत नाही
- ‘हाच देवेंद्र तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा पाडल्याशिवाय राहणार नाही’; फडणवीसांचे थेट आव्हान
- सदावर्तेंप्रमाणे केतकी चितळेचाही होणार महाराष्ट्र दौरा; आतापर्यंत तब्बल 12 ठिकाणी गुन्हे दाखल
- “उताराला लागलेली गाडी अन् वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्याला ब्रेक लागणे कठीण”
- “वजनदार ने हल्के को, बस हल्के से ही वजन से, कल हल्का कर दिया”