मुंबई : विधानसभेचे यंदाचे हिवाळी अधिवेशन चांगलेच गाजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना विधानसभेत माफी मागावी लागली. त्यांच्या या कृतीचा धडा तसा सर्वच आमदारांनी घ्यायला हवा होता मात्र नितेश राणे हे विसरले आणि विधानभवनाच्या पायरीवर त्यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहत म्याव म्याव, असा आवाज काढला.
एसटीच्या कामगारांवर केलेली बडतर्फीची कारवाई मागे घेणार नाही; अनिल परबांची स्पष्टोक्ती
याचे पडसाद गेल्या तीन दिवसांपासून विधानसभेत गाजत आहेत आणि विधानसभेच्या बाहेरही. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या गुन्ह्याखाली आमदार नितेश राणे यांना अटक होण्याची शक्यता आहे. आता त्यावरूनच माजी गृहमंत्री दीपक केसरकर यांनी राणे कुटुंबियांवर टीका केली आहे.
दीपक केसरकर यांनी म्हटले आहे की विधानसभेच्या पायऱ्यावर बसून म्याव म्याव करत मांजराची नक्कल करत चिडवत होते ते आज लपून बसलेत. वाघाला घाबरून की कोर्टाला घाबरून लपून बसले माहिती नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक पोलिसांना बघून घाबरतात ही वस्तुस्थिती असल्याचे दीपक केसरकर यांनी म्हटले. शिवसैनिक संतोष परब यांच्या मारहाणीत नेमका गुन्हा कोणी केला हे माहित नसले तरी जे लपून बसले आहेत ते कायद्यापासून आणि पोलिसांपासून लपून बसलेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी फिरवला फोन; नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज, उद्या कोर्टात फैसला
उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचा धडा घ्या असं म्हणत जर तुम्ही मुलाला चुकीच्या कृत्यासाठी पाठीशी घालत असाल तर तुमचीही हालत त्यांच्यासारखी होईल हे लक्षात ठेवा. नितेश राणे हे सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करून ५ दिवस पोलीस कोठडीत कस्टडीत राहिले हे विसरलेत. त्यांना त्यावेळी मिळालेला जामीन हा सशर्त जामीन मिळाला होता अशी आठवणही केसरकर यांनी करून दिली.
Read also:
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर अज्ञातांचा हल्ला; हल्लखोरांकडे पिस्तूल, तलवारी असल्याचा संशय
- आज अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे कोर्टात; नागरपूरचा दौरा अर्धवट सोडून नारायण राणे कणकवलीत दाखल
- ठरलं तर..! राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात होणार; तारीखही फिक्स
- महाराष्ट्र विधानसभेला अध्यक्ष मिळू नये, ही भाजपची भूमिका – नाना पटोले
- अनिल देशमुखांच्या अडचणी संपेना; न्यायालयीन कोठडीमध्ये आणखी १४ दिवसांची वाढ