मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना सज्जड दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. लोणावळ्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांनी शेळके यांच्यावर निशाणा साधत मी कोणाला सोडत नसतो, अशी भाषा वापरल्याने एकच चर्चा सुरू झाली आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुनील शेळके यांच्यासाठी डाल बनून बाहेर आले आहेत. त्यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना शेळके यांचा बचाव केला आहे.
हेही वाचा..“..लक्षात ठेवा मलाही शरद पवार म्हणतात,” शरद पवारांनी शेळकेंना दिला इशारा
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सुनील शेळके दमदाटी करत असतात. त्यावरून शरद पवार म्हणाले की, सुनील शेळके तु आमदार कोणामुळे झाला, तुझ्या सभेला कोण आलं होतं. पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे, हे लक्षात ठेवा. यापुढे असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात. हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही.
दरम्यान, या संपुर्ण घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पवार साहेब मोठेच आहेत. आज ते इतकी वर्ष राजकारणात आहेत. त्यांना राजकीय क्षेत्रात ५५ वर्ष पुर्ण झाली असून या स्तराच्या नेत्याने एका साध्या आमदाराला धमकी दिली असेल तर ते योग्य नाही. असे मला वाटते. मी त्यांना सल्ला देण्याइतका मोठा नाही. परंतु त्यांनी या गोष्टीचा पुनर्विचार केला पाहिजे. शेवटी ते कुठल्या स्तराला आहेत..याचा विचार केला पाहिजे. असे फडणवीस म्हणाले.
हेही वाचा…“तर फडणवीसांना गुजरातमध्ये जाऊन स्वत : चा प्रचार करावा,” शरद पवार गटाने फडणवीसांना डिवचलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शरद पवारांनी आमदारांना धमक्या द्यायला लागले तर त्यांचा तो स्तर खाली येईल. कोणी आमदार त्यांना किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकी देईल, असे वाटत नाही. असे सांगून फडणवीसांनी शेळके यांची एकप्रकारे पाठराखणच केलीय.
READ ALSO :
हेही वाचा..“सुनील शेळकेंनी मला देखील दम दिला,” शरद पवारांच्या वक्तव्याला माजी मंत्र्यांचं बळ
हेही वाचा“तर नरेंद्र मोदी कचऱ्याच्या डब्यात पडले असते”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
“शेपुट घाल्या गृहमंत्री महाराष्ट्रात आला अन् आमच्यावर फणा काढून गेला”, ठाकरेंचा भाजपवर जोरदार घणाघात
हेही वाचा..“मुंबई पालिका भ्रष्टाचाराचे आगार, 700 कोटींच्या कंत्राटावर डल्ला”, विरोधकांचा हल्लाबोल
हेही वाचा…“नाही तर संपुर्ण महाराष्ट्रात सांगेन की शरद पवारांनी माझ्यावर..,” सुनील शेळकेंचं पवारांना प्रत्युत्तर