लोणावळा : राष्ट्रवादी अजित पवार गटातील जवळपास १३७ पदाधिकाऱ्यांनी आज शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. आज त्यानिमित्ताने लोणावळ्यात राष्ट्रवादीकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र शरद पवारांच्या कार्यक्रमाला कुणीही जाऊ नये, असा थेट इशारा अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी दिला होता. त्यानंतर शेळकेंचा समाचार शरद पवारांनी कार्यक्रमात घेतला.
हेही वाचा…“अजितदादांचे उमेदवार कमळाच्या चिन्हावर निवडणुक लढतील,” बच्चू कडू यांचा मोठा दावा
काही लोकांनी आजच्या कार्यक्रमाला येऊ नये म्हणून आपल्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली आहे. लोकशाही देशात एकमेकांवर टिका केलीच जातेच. परंतु टिका केली म्हणून कार्यकर्त्यांना दमदाटी केली जातेय. त्यामुळे तु आमदार कुणामुळे झाला ? तुझ्या सभेला कोण आला होता ? जेव्हा निवडणुक झाली.त्यावेळी त्या अर्जावर सही माझी आहे. माझ्या सहीमुळेच तु आमदार झालाय. आणि आज ज्या पक्षातील कार्यकर्त्यांनी जीवतोडून पक्षाचं काम केलं आहे. आज त्यांनाच तुम्ही दमदाटी करत आहात. एकदा तुम्ही असं केलं आहे. परंतु पुन्हा केलं तर लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार आहे. असा इशारा शरद पवारांनी दिला.
हेही वाचा…आढळराव राष्ट्रवादीत तर बारणे भाजपमधून निवडणूक लढवणार, शिंदेंच्या सेनेत आणखी पेच वाढला
दरम्यान, शरद पवारांनी इशारा दिल्यानंतर सुनील शेळके यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी जे विधान केलं आहे. ते सुनील शेळके यांनी फेटाळून लावले आहेत. कोणत्याही कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला जाऊ नका. असं सांगितलं नाही. काही जणांनी शरद पवारांकडे माझ्या नावाची चुघली भरली आहे. असे सुनील शेळके यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर फडणवीसांना गुजरातमध्ये जाऊन स्वत : चा प्रचार करावा,” शरद पवार गटाने फडणवीसांना डिवचलं
पुण्यात लोकसभेसाठी भाजपात स्पर्धा वाढली, मोहोळांविरोधात ‘तो’ बॅनर नेमका कोणी लावला ?
हेही वाचा…“अजित पवार गटाचा उडाला गोंधळ,” शरद पवारांनी डिचवल्याने अजित पवार गटाला ‘ते’ ट्विट करावा लागलं डिलीट
हेही वाचा…“जंयत पाटलांना दुसऱ्या पक्षात जाण्याची वेळ येऊ देऊ नका,” अजित दादांच्या आमदाराने रोहित पवारांना फटकारलं
हेही वाचा…कमळावर की धनुष्यबाणावर निवडणुक लढणार ? श्रीरंग बारणेंनी स्पष्ट सांगितले