पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने अजित पवार गट आणि शरद पवार गट असे राष्ट्रवादीत गट पडले आहेत. यातच आता पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाकडून विविध नेत्याची नियुक्ती करण्यात येत आहे.
हेही वाचा…राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार आणि शिंदे गटाला स्थान, १२ जुलै होण्याची शक्यता
यातच पुण्याचे राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिल्याने अजित पवार गटाने त्यांच्या जागी माजी नगरसेवकर दिपक मानकर यांची नियुक्ती केली आहे. तर आज पुणे ग्रामीण जिल्ह्याध्यक्षपदी प्रदीप गारटकर यांची नियुक्ती अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली आहे. त्यांना आज नियुक्तीपत्र मुंबईच्या कार्यालयात देण्यात आले.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन, ५० लाखांची केली मागणी
दरम्यान, अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या प्रवक्तेपदी माजी नगरसेवक रूपाली पाटील यांची नियुक्ती केली आहे. तर अकोला जिल्हाध्यक्षपदी कृष्णराव अंधारे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर पालघर जिल्ह्याध्यक्षपदी आमदार आनंदभाई ठाकूर यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तर अजित पवार राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील,” भाजपच्या बड्या नेत्याच विधान
हेही वाचा…“कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळेंनी उत्तर द्यावे,” अंबादास दानवेंचा भाजपवर पलटवार
हेही वाचा…“फोन आला की लगेच मुंबईला निघू,” मंत्रिमंडळ विस्तारावर भरत गोगावलेंचं मोठं विधान
हेही वाचा…“चक्की पिसिंग पिसिगंवर आरोप केले, त्याचं काय झालं?” अजित पवारांवरून ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार, मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? ठाकरेंचा सवाल