पुणे : राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्याने छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची सुपारी मिळाल्याचं सांगितलं. दरम्यान, धमकी देणाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे अजून एक मंत्र्यांना धमकीचा फोन आला आहे.
हेही वाचा…छगन भुजबळांना जीवे ठार मारण्याची धमकी, धमकीचं कारण आलं समोर
छगन भुजबळ यांना एका व्यक्तीने मद्दधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. यातच आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना देखील धमकीचा फोन आला आहे. परळी येथील कार्यालयात त्यांना धमकीचा फोन आला आहे. तसेच त्यांच्याकडून पन्नास लाखांची मागणी देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा…“अविवाहित राहिन पण, राष्ट्रवादीची युती होणार नाही म्हणजे नाही,” फडणवीसांची ‘ती’ क्लिप ठाकरेंनी भर सभेत ऐकवली
छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्तीनं मद्यधुंद अवस्थेत धमकीचा फोन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःचं नाव प्रशांत पाटील असल्याचं सांगितलं. त्यानंतर छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून पुणे पोलिसांना तात्काळ या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली.
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
पोलिसांनी सर्व तपशील घेऊन तपास सुरू केला. त्यानंतर मोबाईल नंबरच्या आधारे प्रशांत पाटील या व्यक्तीला महाडमधून पुणे पोलीसांनी अटक केली आहे. मद्यधुंद अवस्थेत प्रशांत पाटीलने मंत्री छगन भुजबळांना धमकी दिल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपी प्रशांत पाटील हा मूळचा कोल्हापूरचा आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, काका-पुतण्याच्या संघर्षात मोठा ट्वविस्ट”
हेही वाचा…मोठी बातमी…! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात स्थगिती उठवली, कोणाची नावं चर्चेत ?
हेही वाचा…पंकजा मुंडे ‘या’ विधानसभा मतदारसंघातून लढणार, धनंजय मुंडे सत्तेत सहभागी झाल्याने झाला होता पेच
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसचे २५ नेते दिल्लीत दाखल, ‘या’ नेत्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ? रणनीती ठरणार
हेही वाचा…“‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला