बीड : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सत्तेत सहभागी झाल्याचा निर्णय घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. यातच आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतल्याने परळी विधानसभेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे.
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी २०१९ ची विधानसभा निवडणुक एकमेकांच्या विरोधात लढली होती. परंतु आता राष्ट्रवादी देखील भाजपसोबत गेल्याने पंकजा मुंडे यांना परळी व्यतिरिक्त दुसरा मतदारसंघ देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना गंगाखेड, पाथर्डी विधान सभा मतदार संघातून तिकीट देण्यात येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“..म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी आले नाहीत,” भर कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं कारण
दरम्यान, गंगाखेड, पाथर्डी विधानसभा मतदार संघ या दोन्ही मतदारसंघांमध्ये पंकजा मुंडे यांचा चाहता वर्ग किंवा मतदार वर्ग जो आह तो मोठ्या प्रमाणात आह त्यामुळे या ठिकाणावरून पंकजा मुंडे यांच्या विधानसभा निवडणुकीची चाचणी सुरू असल्याची माहिती समोर येते आह भारतीय जनता पार्टीकडून किंवा या सगळ्या पक्षांकडून त्यांना या दोन मतदार संघात तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसचे २५ नेते दिल्लीत दाखल, ‘या’ नेत्यावर विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी ? रणनीती ठरणार
हेही वाचा…“‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…छगन भुजबळांना जीवे ठार मारण्याची धमकी, धमकीचं कारण आलं समोर
हेही वाचा…“अविवाहित राहिन पण, राष्ट्रवादीची युती होणार नाही म्हणजे नाही,” फडणवीसांची ‘ती’ क्लिप ठाकरेंनी भर सभेत ऐकवली
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा