नवी दिल्ली : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर काॅंग्रेसमध्ये देखील फुट पाडली जाईल, अशी चर्चा राज्यातील राजकीय वर्तुळात केली जात आहे. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड करून शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर विरोधी पक्षनेते पद रिक्त झालं. यातच आता विधिमंडळात सर्वात जास्त संख्या काॅंग्रेसची असल्याने विरोधी पक्षनेते पद देखील त्यांच्याकडे जाणार. या सर्व विषयावर चर्चा करण्यासाठी आज राज्यातील काॅंग्रेसचे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत.
हेही वाचा…“..म्हणून देवेंद्र फडणवीस कार्यक्रमासाठी आले नाहीत,” भर कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं कारण
दिल्लीत होत असलेल्या काॅंग्रेसच्या बैठकीसाठी राज्यातील २५ नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील यांच्यासह अनेक बडे नेत्यांना दिल्लीच्या बैठकीत बोलवण्यात आले आहे. या बैठकीत काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे राहुल गांधी उपस्थित राहणार असून राज्यातील विरोधी पक्षनेते पदासाठी विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तेब होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेचे १६ आमदार अपात्र ठरतील, विधानसभा उपाध्यक्षाचं मोठं विधान
महाराष्ट्रामध्ये महत्त्वाचे काँग्रेसचे नेते या बैठकीसाठी पोहोचलेल्या विरोधी संख्येच्या बाळावर असते आणि आम्ही आमची बाजू मांडलेली आहे. परंतु ती बाजू महाविकास आघाडी म्हणून एकत्रित बसूनच ठरवली जाईल. त्याचा विचार आमच्याकडे आमचे प्रभारी एस के पाटील हे चार दिवसापूर्वी आले होते आणि आमची बैठक झाली. सगळे आमचे आमदार उपस्थित होते. परंतु त्याचा अशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. त्याची जी काही चर्चा होईल ती महाविकास आघाडी म्हणूनच होईल. अशी प्रतिक्रिया काॅंग्रेसचे माजी मुंबई शहाराध्यक्ष भाई जगताप यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या”, फडणवीसांचा ठाकरेंना खोचक टोला
हेही वाचा…छगन भुजबळांना जीवे ठार मारण्याची धमकी, धमकीचं कारण आलं समोर
हेही वाचा…“अविवाहित राहिन पण, राष्ट्रवादीची युती होणार नाही म्हणजे नाही,” फडणवीसांची ‘ती’ क्लिप ठाकरेंनी भर सभेत ऐकवली
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
हेही वाचा…“…म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते”, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा