मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख नागपुराला लागलेला कलंक असा केला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यावर आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…“अजित पवारांचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीला, काका-पुतण्याच्या संघर्षात मोठा ट्वविस्ट”
आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे कलंक नाहीत तर महाराष्ट्र भूषण आहेत. तुमचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. आपण काय बोलत आहोत, याचे भान तुम्हाला राहत नाही. भाजप नेत्यांना उद्देशून तुम्ही मर्दाची औलाद असाल तर असे विधान केले. अशी भाषा एखाद्या गावगुंडाची असते. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना तुम्हला अनेकदा सांभाळून घेतले. तुमचे आणि तुमच्या लहान मुलाचे अक्षर:श लाड केले. त्यांनी कधी भेदभाव केला नाही. तसेच फडणवीस नाही तर तुम्ही महाराष्ट्राला कलंक करांटा आहात. असं बावनकुळेंनी म्हटलंय.
हेही वाचा…मोठी बातमी…! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात स्थगिती उठवली, कोणाची नावं चर्चेत ?
दरम्यान, कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर बावनकुळे यांनी याचे उत्तर दिलं पाहिजे. प्रत्येकवेळी सरकार स्थापनेसाठी मातोश्रीच्या उंबरठ्यावर का येत होतात? मोदींजींच्या चेहऱ्याशिवाय ६३ आमदार निवडून आणून दाखवणाऱ्या माणसाशी सख्य ठेवण्यास का तुमच्या पक्षाची धडपड होती? वयच प्रमाण मानायचे तर फडणवीस यांच्यापेक्षा कमी वयाची माणसे आमदार, खासदार, नगरसेवक म्हणून उद्धव ठाकरे यांनी सभागृहांत पाठवले, हे विसरून कसं चालेल? तुमचे नेते स्वतःचे करियर घडवत होते, कारण त्यांना स्वतःला मोठे व्हायचे होते. उद्धव ठाकरे यांनी माणसं मोठी केलीत. जी रेडिमेड तुम्ही नेलीत आणि सरकार बनवले? हे कसं विसरलात? असे सवाल अंबादास दानवेंनी केले आहेत.
कर्तृत्वाची जंत्री एवढीच मोठी आहे तर…@cbawankule जी, याचे उत्तर पण द्या!
१. प्रत्येकवेळी सरकार स्थापनेसाठी मातोश्रीच्या उंबरठ्यावर का येत होतात?
२. मोदींजींच्या चेहऱ्याशिवाय ६३ आमदार निवडून आणून दाखवणाऱ्या माणसाशी सख्य ठेवण्यास का तुमच्या पक्षाची धडपड होती?
३. वयच प्रमाण…
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 11, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“फोन आला की लगेच मुंबईला निघू,” मंत्रिमंडळ विस्तारावर भरत गोगावलेंचं मोठं विधान
हेही वाचा…“चक्की पिसिंग पिसिगंवर आरोप केले, त्याचं काय झालं?” अजित पवारांवरून ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
हेही वाचा…मोदींना पवारांच्या हस्ते पुरस्कार, मग ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं काय ? ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…राष्ट्रपती भवनात जय्यत तयारी, केंद्रीय मंत्रिमंडळात अजित पवार आणि शिंदे गटाला स्थान, १२ जुलै होण्याची शक्यता
हेही वाचा…राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन, ५० लाखांची केली मागणी