बीड: भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे, त्या ४२ वर्षांच्या झाल्या. २६ जुलै १९७९ हा त्यांचा जन्मदिवस. त्यासाठी सोशल मीडियावर त्यांना खास पद्धतीनं शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या कार्यकर्ते, चाहत्यांमध्ये चढाओढ लागलीय. त्यातही विशेष शुभेच्छा दिल्यात त्या त्यांची लहान बहिण आणि बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी. त्यांनी दोन तीन फोटो ट्विट करत पंकजा मुंडे त्यांच्यासाठी नेमक्या काय आहेत हे सांगण्याचा प्रयत्न केलाय.
हे पण वाचा: दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
पंकजा मुंडेंना शुभेच्छा देण्यासाठी प्रीतम मुंडेंनी फेसबूक आणि ट्विटर अशा दोन्ही माध्यमांचा वापर केलाय. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना प्रीतम ट्विटमध्ये म्हणतात- ‘५ वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणिन जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस👍🏻. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂💐🤗 pic.twitter.com/pVFDG3O7MC
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) July 25, 2021
हे पण वाचा: पुणे महानगर नियोजन समितीची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक
कजा मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रीतम मुंडे यांनी तीन फोटो ट्विट केलेत. फेसबूकवर शेअर केलेत. तीनही फोटोत दोन्ही बहिणी आहेत. यातला पहिला फोटो हा दोघींच्या लहानपणीचा आहे. त्याच फोटोत पंकजा मुंडेंनी कानाला फोनचा रिसिव्हर लावलेला आहे. तर प्रीतम मुंडे ह्या बाजुला बसून हसतायत. त्यांच्या ओठीत एक बाहुलीही आहे. विशेष म्हणजे दोन्ही बहिणींच्या अंगावर सेम ड्रेस आहे. दुसरा फोटो त्यांचा अलिकडच्या काळातला आहे. यात दोन्ही बहिणी ह्या व्यासपीठावर बसलेल्या आहेत आणि काही तरी संवाद त्यांच्यात सुरु आहे. हा संवाद गंभीर चालला असावा असं दोघींच्या चेहऱ्यावरुन दिसतं. त्यातही पंकजा काही तरी प्रीतमना सांगतायत आणि ते त्या मन लावून ऐकताना दिसतायत.
Read Also :
- “भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”
- दादा, तुम्हीच आमचे वाली; चिपळूणच्या व्यापाऱ्यांची नारायण राणेंना आर्त हाक
- हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
- परळीत पंकजा मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त मुंडे समर्थकांची बॅनरबाजी, मात्र भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब
- आढावा बैठकीनंतर पूरग्रस्त भागासाठी, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय