बुलढाणा : सच्चा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हात काॅंग्रेसच्या चिन्हाकडे कधीच जाऊ शकत नाही. ज्यांचा गेला तो बाळासाहेबांचा औलादच नाही, असं म्हणत बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. तसेच त्यांनी विरोधकांवर देखील निशाणा साधला आहे.
“भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
गुरूवादी एका पत्रकार परिषदेमध्ये संजय गायकवाड यांची विरोधकांवर टिका करताना त्यांची जीभ देखील घसरली. विरोधक आघाडी करून तुमची राजकीय कोंडी करू शकतात. येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये विरोधक तुम्हाला लक्ष्य करू शकतात. याचं उत्तर देताना गायकवाड म्हणाले की, वीरो के दुश्मन होते है, शेरों के ही दुश्मन होते है, हि** का कोई शत्रू होता है क्या? असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे ते या वक्तव्यावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.
“भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा
तोच प्रश्न त्यांना पुन्हा विचारण्यात आला असता ते गोंधळून गेल्याचं दिसून आलं. त्यावर ते बोलताना म्हणाले की, तेव्हाही तोच विषय होता की जे शिवसैनिक बाळासाहेबांना मानतात त्यांचा हात तिकडे कधीच जाऊ शकत नाही. आता जे बाळासाहेबांचे नकली शिवसैनिक असतील किंवा जे फक्त ठेकेदारीसाठी गेले असतील अशआंना काही फरक पडत नाही ते लोक कमर्शियल आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला.
“अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप एकत्रित निवडणुकां लढणार असल्याचं दोन्ही बाजूंनी स्पष्ट केलं आहे. भाजप सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्यासाठी तयार आहे. हे गेल्या काही घटनांवरून आपल्याला दिसून येईल. यातच शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गट भाजपला मिळला आहे. त्यांचा निभाव भाजपसोबत आगामी निवडणुकांमध्ये लागणार का ? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
Read also
- “आधी ‘ईडी-पीडा’ टळावी, यासाठी अग्नी पेटवा, खिचडी आपोआप शिजत जाईल”
- ” याद राखा…! अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील”; रूपाली पाटलांचा सज्जड दम
- “केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले
- “..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी
- “नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल