पुणे : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील ह्या आपल्या आक्रमक शैलीने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक राजकीय आंदोलन केली आहेत. तसेच शहरात घडणाऱ्या गोष्टींवर त्या बारकाईने लक्ष ठेऊन असतात. काही अनुचित प्रकार घडला तर त्या अधिकाऱ्यांना देखील सोडत नाहीत. अशाच प्रकारची एक गोष्ट सध्या पुण्यात घडली आहे. त्यावरून त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
“अटक करावी, नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागावी”
गेल्या काही दिवसापासून सेक्सटंड्रा नावाने काही पोस्टर सोशल मीडियावर फिरत आहे. त्यामध्ये त्याची फीस 15 हजार रूपये असून कार्यक्रम ठेवला आहे. तसेच हा कार्यक्रम शिक्षणाची पंढरी मानल्या जाणाऱ्या पुण्यात असल्याने अनेकांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे. त्यावर रूपाली पाटील देखील चांगल्याच भडकल्या आहेत. आयोजकांना अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके मिळतील अशा प्रकारे त्यांना इशारा देखील रूपाली पाटलांनी दिला आहे.
रूपाली पाटील यांनी यासंदर्भात एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, हिंदुचा पवित्र सण नवरात्री व पुण्यनगरिला बदनाम कऱण्याचे कारस्थान थांबवा. पुणे ही शिवजन्मभूमी आहे. पुण्यात सेक्सटंड्रा नावाचे पोस्टर सोशल माध्यमावर फिरत आहे. त्याची फिस 15 हजार सांगण्यात येत आहे. हा प्रथमदर्शनी ऑनलाईन पैसे लुटणाऱ्या टोळीचा फ्रॉड असू शकतो किंवा पुण्याला बदनाम करणाऱ्या सेक्सटंड्रा आडून कुणी जर सेक्सट्रंड्रा चालवण्याचा प्रयत्न करणार असेल तर, इथं थिल्लरपणा चालणार नाही.
“पतीव्रताच नसेल तर दागिने घालून काय फायदा?”खडसेंचा शिंदेंना खोचक टोला
दरम्यान, आयोजकांना विनंती आहे. आपण हा थिल्लरपणा तात्काळ थांबवावा अन्यथा सेक्सथंड्रा आयोकांना अगोदर चाबकाचे फटके मग कायद्याचे फटके पडतील असा इशारा त्यांनी दिला आहे.
Read also
- “केंद्र आणि राज्य सरकार मिळून महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक लावत आहेत का?”; नाना पटोले
- “..तर निवृत्त न्यायधिशांमार्फत चौकशी करा”; आशिष शेलारांचा मागणी
- “नाणार, जैतापूर, बुलेट ट्रेन, मेट्रो कारशेड रखडवणारा गद्दार कोण?”; भाजपचा शिवसेनेला सवाल
- “भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचं निव्वळ चॉकलेट देऊ नका”; अशोक चव्हाण भाजपवर संतापले
- “भगवान गडावर दसरा मेळावा घेणारच, करूणा मुंडे ठाम”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी चर्चा