मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या सोबत केलेल्या शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर आता शिंद् गटाकडून शिवसेनेवरच दावा ठोकला आहे. उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार हल्लाबोल सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे, देवेद्र फडणवीस, भाजप, नरेंद्र मोदी , अमित शहा यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकास्त्र सोडले आहे. तर शिंदे यांना मुख्यमंत्री पदासोबत आता शिवसेना प्रमुख पद ही पाहिजे आहे, असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
“महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
एकनाथ शिंदे हे शिवसैनिक नाहीत तर दगाबाज मुख्यमंत्री आहेत. शिंदे गटाला बाळासाहेबांचा फोटो हवा आहे, पण त्यांचा मुलगा नको आहे. मी वरसा घेऊन पुढे जातोय, म्हणून मी त्यांना नको आहे. ठाकरेंशिवाय शिवसेना होऊ शकते, अंस त्याना वाटत असेल तर कदापि होऊ शकणार नाही. मी त्यांना प्रत्येकवेळी आव्हान देतोय की, मर्दाची अवलाद असाल तर स्वत:च्या आई-वडिलांच्या नावाने मतं मागा. माझे आई-वडील आणि शिवसेना ही आपली आईच आहे, ती कशाला सोडताय. काढा नवीन पक्ष, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी नंतर आता बाळासाहेब यांच्यासोबत शिवसेनेत काम केलेल्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणुक काम केलेल्या आणि बाळासाहेबांसोबत शिवसेनेला महारष्ट्रात पोहचवणाऱ्या मनोहर जोशी यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घएतल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे. शिवसेनेतील अनेक नेते शिंदे यांच्या गटात सामिल होत आहेत.
“संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसनेने 14 आमदारावर आपात्रतेची याचिका कोर्टात दाखल केली. या याचिकेवर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. या याचिकेचा निकाल कोणाच्या बाजुने लागणार हे पाहणे ही महत्वाचे ठरणार आहे. तसेच लोकसभेतील 12 खासरदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय महानगर पालिका आणि नगरपालिकांमधील अनेक आजी-माजी नगरसेवक शिंदे गटात सामिल झाले आहेत.
Read also
- “वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय, तर कुणी कुंटणखाना”; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा
- मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी..; अजित पवारांनी थेट बांधावरून मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले
- “आता फक्त उद्धव ठाकरेंसाठी काम करणार”; शिक्षकांनी सेनेसाठी दिला राजीनामा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..
- “ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित