अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि अकोल्याचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवा मोहोड यांच्यावर 5 कोटीची मानहानीची दावा केला होता. आता शिवा मोहोड यांनी अमोल मिटकरींवर मानहानीचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या वादाला नवीन वळण लागलं आहे.
“स्वत: ला पक्षात उमेदवारी मिळेना अन् बारामती जिंकणार म्हणे”; रूपाली पाटील
आमदार मिटकरींनी बदनामीकारक केलेले विधान आणि मानसिक स्थिती अस्वस्थ केल्याने मोहोड यांना अनेक यातना भोगव्या लागल्या. चरित्र्यावरून बदनामीकारक विधान केले असल्याने मोहोड यांच्या चारित्र्याला समाजात धक्का बसला आहे. प्रतिष्ठा स्थान खराब केले आहे. यामुळे त्यांना मानसिक छळ आणि यातना सहन कराव्या लागत आहेत. आणि समाजाच्या नजरेत त्यांची प्रतिमा मलीन झाली आहे.
या पार्श्वभूमीवर मोहोड यांच्या चरित्र्यावर वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार अमोल मिटकरी यांना नोटीसद्वारे 7 दिवसांच्या आत लेखी माफी मागण्याचं आवाहन करण्यात आले आहे. या नोटीसची पावती आणि एका रूपयांची नुकसान भरपाई देखील केली आहे. नाहीतर कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात येईल, असा इशारा नोटीसद्वारे दिला आहे. मोहोड यांच्या बदनामीप्रकरणी या कायदेशीर सूचनेसाठी दहा हजार शुल्क भरण्यास देखील जबाबदार आहेत, असं नोटीसमध्ये नमूद केलं आहे.
“ज्याच्याबरोबर जास्त आमदार आणि खासदार त्यांंचाच शिवाजी पार्कवर दसरा मेळावा”
आमदार अमोल मिटकरी यांनी आरोप करणाऱ्या शिवा मोहोड यांचं चरित्र आणि चारित्र्य तपासावं, असा पलटवार मिटकरी यांनी केला होता. शिवा मोहोड यांच्यावरचे आरोप आणि गुन्हे तपासावेत. शिवा मोहोड यांचा विकासनिधीसाठी एकही प्रस्ताव आपल्याकडे आलेला नाही. त्यांनी त्यांच्याकडील प्रस्थाव दाखवावा, असं आव्हान मिटकरी यांनी मोहोड यांना दिलं आहे.
Read also
- “शिवसेना-मनसे एकत्र यावेत हे बाळासाहेबचं भाकीत जर सत्यात उतरत असेल तर”
- “सुप्रिया सुळेंना पराभूत करण्याची भाषा हास्यास्पद “; रविकांत वर्पे
- 7 वेळा संसदरत्न, 3 वेळा लोकसभा खासदार, संसद विशिष्ट रत्न पुरस्कार; बारामतीत सुप्रिया सुळेंना हरवणे शक्य आहे का?
- “राग आल्यावर काहीही करतो, आता मी गुलाबराव पाटलांचा गळा दाबणार”; चंद्रकांत खैरे
- “वारंवार सांगूनही खात्यावर पैसे यायचे थांबत नसल्याने राजू शेट्टींनी गाठलं थेट तहसिल कार्यालय”