मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, विधानसभेच्या आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, भाजपकडून राज्यातील ४ नवनिर्वाचित खासदारांच्या नेतृत्वाखाली ‘जन आशीर्वाद’ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली असून, भाजपच्या ‘जन आशीर्वाद’ यात्रेने राज्याला मोठा धोका निर्माण होणार आहे, अश्या आशयाचे एक विधान त्यांनी केले आहे.
संभाजी ब्रिगेड आणि मनसे वाद चिघळला, नेत्याने दिले थेट राज ठाकरेंना खुले आव्हान
संपूर्ण राज्य महामारीतुन बाहेर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. जनतेला बाहेर दुष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र राज्यातील भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री ‘जन आशीर्वाद’ यात्रा काढत आहेत. तुम्ही ज्याप्रकारे, मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यांनंतरही लोकांना मुद्दामून एकत्र करताय, त्यावरून ही ‘जन आशीर्वाद’ यात्रा म्हणजे महामारीच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे.
टेंडर ऑफलाईन अन् पालिकेची सभा ऑनलाईन का? काँग्रेस नेते आबा बागुलांचा भाजपला रोखठोक सवाल
तसेच, मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने उधळताना त्यांनी, “शिक्षण, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, डेव्हलपमेंट असेल सगळीकडे सावधगिरीने पावलं टाकून त्यांचं काम सुरू आहे. संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्या कामगिरीकडे आहे. घरी बसून कोणी टॉप ५ मध्ये येतं का?” असा सवाल करत त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “सध्याच्या काळात सगळेच वर्क फ्रॉम होम करत होते. पण तुम्ही मात्र उकीरडे फुंकत हिंडलात सगळीकडे,” असा निशाणा देखील त्यांनी विरोधकांवर साधला
दरम्यान, ‘इंडिया टुडे’ या माध्यम समुहाच्या माध्यमातून, देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या लोकप्रियतेचे आणि कामगिरीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात देशातील टॉप ५ मुख्यमंत्र्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. तसेच, इतरही अनेक संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणातून असेच काहीसे निकाल आल्याने त्याचा संदर्भ घेऊन त्यांनी, “आपल्या कार्यकुशलतेतून मुख्यमंत्री हळूहळू देशात पहिल्या क्रमांकाचे मुख्यमंत्री बनतील. भाजपचे कुणी टॉप १० मध्ये तरी होतं का?” अशी खोचक टीका भाजपवर केली.
Read Also :
- देवेंद्रजी, तुमची सात भेटली तर बैलगाडा शर्यत लवकर चालू करु – खासदार डॉ. अमोल कोल्हे
- आठवा महिना लागला तरी स्वतःचा पाय स्वतःच्याच धोतरात – शिवसेना
- शिवसेना आमदार यामिनी जाधव यांची आमदारकी धोक्यात; १५ कोटींच्या संपत्तीवर आयकर विभागाची टाच
- “आपला अनुभव किती, राजकीय कारकीर्द काय?, रुपालीताई तुमची राजकीय शूर्पणखा होऊ देऊ नका!”
- “चंद्रकांतदादा, जेवढं तुमचं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकीर्द”, रुपाली चाकणकरांचा जोरदार वार