अकोला : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेला एका मद्य उद्योग करणाऱ्या कंपनीला दत्तक दिले गेले आणि त्या कंपनीने त्या शाळेत गौतमी पाटीलचा नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. पोरांना काय शिकवायचं तर गौतमीचा धडा द्यायचा का त्यांना ? नव्या पिढीवर आपण काय संस्कार करतोय याचा विचार सरकारच्या मनात नाही आहे. अशी टिका शरद पवारांनी केली आहे. अलिकडेच जिल्ह्या परिषदेच्या शाळेत गौतमी पाटीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावरून शरद पवारांनी संताप व्यक्त केला आहे. अकोला येथे आयोजित सहकार महर्षी कै. डॉ. वा. रा. उपाख्य अण्णासाहेब कोरपे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याच्या समारोप कार्यक्रमानिमित्त सहकार महामेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“सुप्रिया सुळे बहिणीसारख्या, त्यांची इच्छा पूर्ण करणार”, भुजबळांनी सुप्रिया सुळेंना दिला शब्द
नोकऱ्या या दिवसेंदिवस कमी होत आहेत. पण, नोकऱ्यांच्या बाबतीत हल्लीच्या सरकारने एक नवीन भूमिका घेतली आणि ती भूमिका म्हणजे कंत्राटी पद्धतीने नोकऱ्या मिळवायची. आजच्या वर्तमानपत्रात बातमी आहे की, महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रात पोलिसांची भरती कंत्राटी पद्धतीने करायची. आता जो पोलीस कंत्राटी भरतीने दाखल होतो त्याला ठाऊक असते की, आपले कॉन्ट्रॅक्ट हे वर्ष दीड वर्षाचे आहे, आपली नोकरी ही जास्त काळाची नाही आपल्या नोकरीत कन्फर्मेशन नाही. अशी खंतही शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…Video! “एक पक्ष, एक नेता आणि एक विचार”, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याचा टिझर जारी
दरम्यान, पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, कंत्राटी पद्धतीमुळे अनेक क्षेत्रांमध्ये खाजगीकरण वाढायला लागलेले आहे. शिवाजी एज्युकेशन सोसायटी ही उत्तम शिक्षण संस्था आहे परंतु, राज्य शासनाने जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या शाळांना दत्तक द्यायला सुरुवात केलेली आहे आणि या शाळा संस्थांना न देता एखाद्या खाजगी कंपन्यांना दत्तक दिल्यामुळे शाळांचा उपयोग वैयक्तिक कामांसाठी केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ससून रूग्णालय ड्रग्ज प्रकरणाची चौकशीसाठी समिती स्थापन, दोषींवर कारवाई होणार
हेही वाचा…भाजपचे माजी खासदार संजय काकडेंना महापालिकेचा मोठा दणका, ३० दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…२० तारखेला शिवसेनेच्या आमदार अपात्रसंदर्भात निकाल लागणार, सर्वांचं निकालाकडे लक्ष
हेही वाचा…अजित पवार अन् सुळेंवरील टिका पडळकरांना भोवणार, ७ दिवसात माफी मागितली नाही तर होणार कारवाई
हेही वाचा…“शरद पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी फडणवीसांचा विजयरथ थांबणार नाही”