पुणे ( प्रतिनिधी ) : पुणे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या अडचणीत वाढ कमी होण्याचं नाव घेत नाही. सुरूवातीला उमेदवारीवरून कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने धंगेकर समोर मोठा पेच निर्माण झाला होता. अशातच आता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांनी पुण्यातील धंगेकरांचा प्रचार थांबवण्याचे आदेश दिल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे धंगेकर यांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“तटकरेंना प्रचंड मतांनी खासदार करण्यासाठी झपाटून कामाला लागा”, अदिती तटकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
मंगळवारी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जागावाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तिन्ही पक्षांत एकवाक्यता असल्याचे दिसून आले. मात्र काही मतदारसंघावरून आघाडीत असलेली नाराजी उघडउघड बघायला मिळाली. यातच आता पुणे लोकसभा मतदारसंघाबाबतही याच मुद्द्यावरून कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडली असल्याचे सध्या चित्र निर्माण झाले आहे.
ठाकरे गटाच्या वरीष्ठ नेत्यांनी कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवण्याच्या सुचना शिवसैनिकांना दिल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आले आहे.
हेही वाचा…चंद्रहार पाटलांकडून विशाल पाटलांना पुन्हा साद, म्हणाले..”तर तुम्ही आता …”
दरम्यान, सांगली आणि भिवंडीच्या जागेवरून ठाकरे आणि मित्र पक्षांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी यावरून जाहिररित्या एकमेकांवर टिका करण्यात सुरूवात केलीय. ही सर्व परिस्थिती पाहतांना कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सुर दिसून येत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्याकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार केला जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार थांबवण्याची सुचना केल्याची माहिती विश्वनीय सुत्रांनी दिलीय. याबाबत न्यूज १८ लोकमतने देखील वृत्त दिले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नव्हे तर महायुतीचा खासदार विजयी होणार”,अदिती तटकरेंचा विश्वास
हेही वाचा…“‘कळतं पण वळत नाही’ अशी भूमिका का घेतली जातेय?” राष्ट्रवादीने राज ठाकरेंना सुनावलं
हेही वाचा…सातारा अन् रावेरसाठी शरद पवार गटाचे उमेदवार घोषीत, माढ्याचा तिढा अजूनही कायम
हेही वाचा…“जर मी तोंड उघडलं तर यांना फिरता येणार नाही”, अजित पवारांनी बारामतीत ‘नेमका’ कुणाला दिला इशारा
हेही वाचा…“कामं मी केलीत अन् श्रेय विद्यमान खासदारानं घेतलं”, अजित दादांनी सुप्रिया सुळेंचा पाडाच वाचला