नाशिक : १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्तावरून विधानसभेत जोरदार वार-पलटवार झालेत. सलीम कुत्ता याच्यासोबत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर पार्ट्या करत असल्याचे फोटो भाजप आमदार नितेश राणे यांनी सभागृहात दाखवले. त्यानंतर मग विरोधकांनी त्याच पार्टीतील गिरीश महाजन, देवयानी फरादे, यांच्यासह बाळासाहेब सानप यांचेही फोटो ट्विट केलेत. त्यावरून शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आणि भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्यात या प्रकरणावरून चांगलीच जुंपली. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी फरांदे यांना पुन्हा डिचवण्याचा प्रयत्न केलाय.
हेही वाचा…ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, पुढचा मुक्काम ‘या’ जेलमध्ये
नितेश राणे यांनी फोटो दाखवल्यानंतर याप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी केली जाईल, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. त्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्याच पार्टीतील गिरीश महाजन, देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप यांचे फोटो ट्विट करून कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर हे सर्व आरोप फेटाळून सुषमा अंधारे यांच्यावर सभागृहात हक्कभंग आणणार असा इशारा देवयांनी फरांदे यांनी सुषमा अंधारे यांना दिला. त्यावर आता सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे खासदार एकनाथ खडसे यांचा सलीम कुत्ता प्रकरणाचा व्हिडीओ ट्विट करत चांगलाच टोला लगावलाय.
हेही वाचा…ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेकडून खिंडार ; तब्बल १०७ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
विधान परिषदेत एकनाथ खडसे यांनी त्याच पार्टीतील भाजपचे नेत्यांचा फोटो दाखवत कारवाई करण्याची मागणी केली. तोच व्हिडीओ ट्विट करत अंधारे म्हणाल्या की, गिरीश महाजन आणि देवयानी फरांदे यांना आता काही बोलायचे आहे का ? हक्कभंगाची भाषा करणाऱ्या फरांदे आता कुठे गायब आहेत. ? तुम्ही त्या लग्नाला होतात हे सिद्ध झाले. बडी भाभीचा उल्लेख म्हणजे आपलाच उल्लेख आहे. असे ठामपणे फरांदे यांना का वाटते ? फरांदे आतून घाबरल्या आहेत का ? असा खोचक सवालही सुषमा अंधारे यांनी केलाय.
गिरीश महाजन आणि आ. देवयानी फरांदे यांना आता काही बोलायचे आहे का? हक्कभंगाची भाषा करणाऱ्या फरांदे आता कुठे गायब आहेत? तुम्ही त्या लग्नाला होतात हे सिद्ध झाले. “बडी भाभीचा उल्लेख म्हणजे आपलाच उल्लेख आहे असे ठामपणे फरांदे यांना का वाटते? आ. फरांदे आतून घाबरल्या आहेत का? @OfficeofUT pic.twitter.com/hjDzqMjD7u
— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) December 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“तर या देशात हुकूमशाही यायला वेळ लागणार नाही”, ९२ खासदारांच्या निलंबणाच्या कारवाईवर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
हेही वाचा…“संसदेच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई, ९२ खासदार निलंबित, राष्ट्रवादीच्या ‘या’ खासदारांचाही समावेश”
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांसाठी ४४ हजार कोटीचं पॅकेज जाहीर
हेही वाचा…मोठी बातमी..! मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या शिंदे समितीचा दुसरा अहवाल सरकारला सादर
हेही वाचा…“लोकसभेतील ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई,” सुप्रिया सुळे म्हणाल्या..