नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या सोमवारी कामकाज सुरू होताच विरोधी पक्षातील खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभेतील १३ तर राज्यसभेतील एका खासदाराला निलंबित करण्यात आलं होतं. यात आज देखील यावरून विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी आज तब्बल ३३ खासदारांना निलंबित केले आहे. आतापर्यंत ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. त्यावर आता सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा...सलीम कुत्ता प्रकरणाबाबत राजकीय हालचाली वाढल्या ; ठाकरे गटातील नेत्याच्या अडचणी वाढल्या
लोकसभेतील एकूण ४६ खासदारांवर निलंबणाची कारवाई केली. या घटनेवर लोकशाहीची हत्या असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. लोकसभेतील ४६ आणि राज्यसभेतील ४६ खासदारांचे अभूतपुर्व निलंबन करणं हा लोकशाहीवर भयावह हल्ला आहे. खासदार हे आपापल्या मतदारसंघातील निवडून आलेले लोकांचे प्रतिनिधी आहेत. ज्यांना प्रश्न विचारण्याचा आणि सरकारला जबाबदार धरण्याचा अधिकार आहे. विरोधी खासदारांच्या निलंबनामुळे निर्णयाचा मनमानीपणा आणि संसदेतील सुरक्षाभंगासारख्या गंभीर गोष्टीसाठी सत्ताधारी सरकारला जबाबदार धरले जाण्याची भीती दिसून येते. आमच्या संवैधानिक मुल्यांच्या या अपमानाच्या विरोधात सहकाऱ्यांसोबत एकजुटीने उभी आहे. अस सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
हेही वाचा…विधानसभा निवडणुकांच्या पराभवानंतर काॅंग्रेस पुन्हा कामाला लागली, दिल्लीत २१ तारखेला महत्वाची बैठक
संसदेत झालेल्या घुसखोरीनंतर गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं अशी मागणी विरोधकांनी सभागृहात सुरूवातीलाच लावून धरली. मात्र लोकसभा सचिवालयाकडे सुरक्षेची जबाबदारी असल्याचं स्पष्टीकरण लोकसभा अध्यक्षांनी दिलं. तरी देखील विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी आज तब्बल ३३ खासदारांना निलंबित केलं आहे. त्यामुळे आता निलंबित खासदारांची संख्या ४६ वर गेली आहे. काॅंग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी, तृणमूलचे सौगत रॉय, डीएमकेचे टी आर बालू यांचा समावेश आहे.
Murder of Democracy!
The blanket and unprecedented suspension of 46 Lok Sabha MPs and 46 Rajya Sabha MPs is an alarming assault on democracy. MPs are the elected representatives of their respective constituencies who have the right, rather duty to question and hold the…
— Supriya Sule (@supriya_sule) December 18, 2023
READ ALSO :
हेही वाचा..ड्रग्ज माफिया ललित पाटीलची कारागृहात रवानगी, पुढचा मुक्काम ‘या’ जेलमध्ये
हेही वाचा…ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेकडून खिंडार ; तब्बल १०७ पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…एका दिवसात तब्बल ३३ खासदार निलंबित ; मोठं कारण आलं समोर
हेही वाचा…पिंपरी चिंचवड पालिकेत कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार ; आयुक्तासंह,अधिकारी अन् नेत्याचे दाबे दणाणले, प्रकरणात बंटी बबलीची एन्ट्री
हेही वाचा…“महाराष्ट्र हा दिल्लीच्या मार्गावरील पायपुसणं झालंय”, राऊतांची सरकारवर जोरदार टिका