हिंगोली : विधान परिषदेच्या काॅंग्रसेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात गेल्या महिन्यात हल्ला झाला होता. त्यानंतर त्याचे पडसाद राज्यभरात उमटले होते. या घटनेनंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर जहरी टिका केली होती. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ला प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे.
हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला
प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास केल्यानंतर काही बाबी समोर आल्या आहेत. सातव यांच्यावर हल्ला करणारा आरोपी कोणत्याही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाही. दारूच्या नशेत त्याने गुन्हा केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आमदार सातव यांनी यासंदर्भात विधान परिषदेत मुद्दा मांडला होता.
हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला
दरम्यान, काॅंग्रेसच्या हात से हात जोडो अभियानसाठी डॉ. सातव कळमनुरी गावात गेल्या होत्या. त्यावेळी एका व्यक्तींनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला होता. त्यांच्याशी हुजत घालत पाठीमागून येऊन धक्काबुक्की केल्याचीही चर्चा होती. त्यानंतर त्या गावात पोहचल्यानंतर त्यांची गाडीही अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची तपासणी केली असता त्यातून माहिती समोर आली आहे.
Read also
- हेही वाचा..“मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक”, संजय राऊतांचं स्पष्टीकरण
- हेही वाचा..“भाजपला चोपायची ‘ही’ संधी मला सोडायची नाही, शरद पवारांची भेट घेऊन..” अमोल मिटकरींनी भाजपला दिला इशारा
- हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..
- हेही वाचा.“एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारची कुंडलीच वाचली,” राणे, कंगना, राणा, सगळंच सांगितलं
- हेही वाचा.भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त