मुंबई : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत वेगवेगळ्या कारणांमुळे चांगलचे चर्चेत राहतात. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वर्तमानपत्रात ते कार्यकारी संपादकही आहेत. अनेक आपल्या संपादकीय लेखनातून ते भाजप आणि विरोधी पक्षांवर तोप डागतात. त्यातच आता त्यांनी निवडणुक आयोगाला शिवी दिल्याने त्यांच्यावर टिका करण्यात आली आहे. त्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे.
हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला
निवडणुक आयोग हा भ्रष्ट आयोग आहे असं लोकांना वाटते, निवडणुक आयोगाचे काम योग्यरितीने चालले नाही हे सुप्रीम कोर्टाच्याही निदर्शनास आले. ४० आमदार फुटले म्हणून अख्खा पक्ष फुटिरांच्या हातात ठेवला नसता. माझ्यादृष्टीने मी जो शब्द वापरला ते योग्यच आहे. मी घटनाबाह्य वागणाऱ्या संस्थेला शिवी दिली हा उद्रेक आहे. शिवीगाळ नाही. अस संजय राऊतांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..“भटक्या कुत्र्याचा त्रास, जिथं दिसेल, तिथून उचला अन् गुवाहाटीला नेऊन टाका,” राणें अन् बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे ?
तसेच पुढे बोलतांना ते म्हणाले की, माझ्या भाषेत मी कायम संयमच ठेवला. गेली २० वर्ष मी संसदेत खासदार आहे. कितीवेळा असा प्रसंग आला मी शिवीगाळ केली? मी शिव्यांचे स्पष्टीकरण देऊ शकतो. निवडणुक आयोगाला दिलेली शिवी ही ठरवून दिली होती. कारण ती लोकभावना होती. लोकशाहीत आक्षेप घेतला जाऊ शकतो, मी शिवीगाळ करतो असं म्हटलं गेले. राज्यातील जनता मला ओळखते, गेली ४०-४५ वर्ष सातत्याने लिखाण करणारा माणूस आहे. माझ्या लिखाणात मी कधीही अशाप्रकार भाषेचा वापर केला नाही. माझी भाषा स्पष्ट, परखड असते. असंही ते म्हणाले.
हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट
दरम्यान, संस्कृती सोडून भाषा वापरली गेली. गरजेनुसार भाषेचा टोन कमी जास्त असेल. शिवीला माझा आक्षेप नाही. संत साहित्यातही शिव्या खुप आहेत. जनाबाईंचा अंभग आहे, अरे विठ्या विठ्या..! मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी झाली, जन्मसावित्री चुडा ल्याली” असे अनेक अंभग माझ्या मुखात आहे. मी संत साहित्याचा सुद्धा अभ्यासक आहे. असंही त्यांनी सांगितले.
Read also
- हेही वाचा..“भाजपला चोपायची ‘ही’ संधी मला सोडायची नाही, शरद पवारांची भेट घेऊन..” अमोल मिटकरींनी भाजपला दिला इशारा
- हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..
- हेही वाचा.“एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारची कुंडलीच वाचली,” राणे, कंगना, राणा, सगळंच सांगितलं
- हेही वाचा.भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त
- हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला