मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फुट पडली. शिवसेनेतील ५५ पैकी ४० आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदेंची वाट धरली. त्यानंतर निवडणुक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला बहाल केला. याचा मोठा फटका उद्धव ठाकरेंना बसला आहे. यातच आता नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत.
हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट
उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या पक्षाची नवी घटना निर्माण करण्यासाठी लीगल फर्मची नेमणुक करण्यात आली आहे. शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव सध्या ठाकरे गटाकडून सगळीकडे लावले जात आहे. तर मशाल चिन्हाचा वापर केला जात आहे. शिवसेना हा मुळ पक्ष हातातून गेल्यानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कामाला लागला आहे.
हेही वाचा.“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून घ्या,” माजी खासदाराची फडणवीसांकडे मागणी
नव्या घटनेत हा जुन्या शिवसेनेतील घटनेचा गाभा असणार आहे. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद नव्या पक्षातही कायम असेल. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे सर्वाधिकार राहतील अशी माहिती मिळत आहे. जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच गाभा कायम ठेवणार आहेत. पक्षाची नवी घटना तयार करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची टीम तयार करण्यात येणार आहे.
Read also
- हेही वाचा.“एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारची कुंडलीच वाचली,” राणे, कंगना, राणा, सगळंच सांगितलं
- हेही वाचा.भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त
- हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला
- हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला
- हेही वाचा..“भटक्या कुत्र्याचा त्रास, जिथं दिसेल, तिथून उचला अन् गुवाहाटीला नेऊन टाका,” राणें अन् बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे ?