मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रश्नांना उत्तर देतांना एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारची कुंडलीच वाचली. त्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काय काय घटना घडल्या. त्यावरून त्यांनी विरोधकांना कोंडीत पकडलं. तसेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलचं तापलं.
हेही वाचा.“संजय राऊत अन् आदित्य ठाकरेंची सुरक्षा काढून घ्या,” माजी खासदाराची फडणवीसांकडे मागणी
महाविकास आघाडी सरकारच्या काळात साधू हत्याकांड, संभाजीनगर दुर्दैवी घटना, साकीनाका दुर्दैवी घटना, मनसुख हिरेन प्रकरण घडले. तुम्ही आता गुन्ह्याची आकडेवारी दाखवली. मात्र, आता गुन्ह्याची नोंद होत आहे. दखल घेतली जात आहे. गुन्हेगाराला आळा घालण्याचे काम सरकार करणार आहे. रवी राणांच्या पत्नीला आत घातले. कंगना राणावतचे घर तोडले. गिरीश महाजन, नारायण राणे, देवेंद्र फडणवीसांच्या कुटुबांची चौकशी लावली. आशिष शेलारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. असंही त्यांनी म्हटलं.
हेही वाचा..““रोज उठा आदित्यांना शिव्या द्या, अन् प्रसिद्धी मिळवा, मनसेचा हा नवा धंदा,” आदित्य ठाकरेंची बोचरी टिका
त्याचबरोबर एमपीएससीच्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्हाला चालवायची आहे. एमपीएससीचे सगळे प्रश्न सोडवणार. सगळी पदे भरली आहेत. सहा सदस्य झालेत. आता अ, ब गटाचे पद भरत आहेत. ज्या दिवशी मुलाखत, त्या दिवशी निकाल हाती पडेल. असंही त्यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा.भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त
- हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला
- हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला
- हेही वाचा..“भटक्या कुत्र्याचा त्रास, जिथं दिसेल, तिथून उचला अन् गुवाहाटीला नेऊन टाका,” राणें अन् बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे ?
- हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट