अकोला : पक्षाने संधी दिल्यास 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात निवडणुक लढविणार, असे संकेत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिले आहेत. भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त असल्याचं सांगत मिटकरी यांनी आपली इच्छा व्यक्त केली आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी याबाबत एक ट्विट केलं आहे. त्यामुळे त्याची चर्चा संध्या रंगली आहे.
हेही वाचा..“भटक्या कुत्र्याचा त्रास, जिथं दिसेल, तिथून उचला अन् गुवाहाटीला नेऊन टाका,” राणें अन् बच्चू कडूंचा रोख नेमका कुणाकडे ?
अकोल्याचे भाजपचे खासदार संजय धोत्रे प्रकृती बिघडल्याने गेल्या काही वर्षापासून ते राजकारणापासून थोडे दुर गेले आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आता अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणार उतरण्याचे संकेत दिले आहेत. “माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरूद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार..! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरूद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची हि संधी मला सोडायची नाही.”असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..सत्यजीत तांबेंचं सभागृहात पहिलचं भाषण, थेट फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयांवर ठेवलं बोट
दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत अकोल लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे, भारीप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर आणि काॅंग्रेस-राष्ट्रवादीकडून काॅंग्रेसचे हिदायत पटले अशी तिरंगी लढत झाली होती. तेव्हा संजय धोत्रे वियजी झाले होते. त्यातच आता संजय धोत्रे यांची तब्येत बिघडल्याने अमोल मिटकरी यांनी सुचक संकेत दिले आहेत.
माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार ! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त व भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार.भाजपला चोपायची हि संधी मला सोडायची नाही.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) March 6, 2023
Read also
- हेही वाचा..“नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे लागले कामाला..! ठाकरेंच्या नव्या शिवसेनेचा प्लॅन ठरला..
- हेही वाचा.“एकनाथ शिंदेंनी मविआ सरकारची कुंडलीच वाचली,” राणे, कंगना, राणा, सगळंच सांगितलं
- हेही वाचा.भाजप आमदाराच्या पुत्राचा मोठा कारनामा..! सकाळीच धाड अन् 6 कोटीची रोकड जप्त
- हेही वाचा..Good News : पिंपरी-चिंचवडकरांचा शास्तीकर पूर्ण माफीचा ‘जीआर’ अखेर आला !राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘शब्द’ पाळला
- हेही वाचा..पहाटेच्या शपथविधीबाबत थोड्याच गोष्टी सांगितल्या, सगळ्या सांगतील तेव्हा… शिंदेंनी सभागृहात राजकीय बॉम्ब टाकला