पुणे : देशात एव्हाना राज्यात महागाईने सामान्य माणसांचं कंबरडं मोडलं आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगणाला भिडल्या आहेत. यावरून देशात काॅंग्रेसने मोदी सरकार विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये आता राज्यात राष्ट्रवादी काॅंग्रेसने देखील मोदी सरकारविरोधात पुण्यात जोरदार घोषणाबाजी केली आहे. अशातच आज राष्ट्रवादीने पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या वक्तव्याची आठवण करून देत निशाणा साधला.
वाढती महागाई आणि भ्रष्टाचाराचे चित्र लोकांपुढे मांडून २०१४ साली सत्तेत आलेल्या मोदी सरकारने ‘ना खाऊंगा, ना खाने दुँगा’ अशी घोषणा केली होती. याच वाक्याला केंद्र सरकारने सत्यात उतरवल्याचे चित्र निर्माण झाले आहे. देशातील महागाईने मागील आठ वर्षांतील महागाईचा उच्चांक गाठला आहे. ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) हा एप्रिल २०२२ या महिन्यात ७.७९ टक्क्यांवर पोहचला आहे. २०२१ च्या एप्रिल महिन्यात सीपीआय हा ४.२३ टक्के होता तर मार्च २०२२ मध्ये ६.९५ टक्के होता. असंही राष्ट्रवादीने म्हटलं आहे.
‘सरकार टिकवायचं असेल तर आमचंही ऐका’; महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर
सत्तेत आल्यापासून मोदी सरकारने सामान्य जनतेला केवळ धक्केच दिले आहेत. नोटबंदी, बेरोजगारी, गॅस दरवाढ आणि आता महागाईचा हा चढता आलेख यातून मोदी सरकार देशाला श्रीलंकेच्या वाटेवर घेऊन जाणार की काय अशी भावना सामान्य माणसाच्या मनात येत आहे. असंही म्हटलं आहे. तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारच्या विरोधात अलिकडेच पुण्यात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं.
“संजय राऊतांमध्ये कादर खान घुसलाय, हा रोजचा तमाशा बंद करा”
दरम्यान, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शनिपार येथे वाढत्या महागाईच्या विरोधात आयोजित आंदोलनात करण्यात आले होते. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वसामान्य जनतेला अडचणींचा सामना करावा लागत आहे. महागाई कमी करण्यासाठी राष्ट्रवादीकडून मारुतीरायाला साकडे घालण्यात आले. यावेळी महागाईची आरती करण्यात आली. या आंदोलनात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुशआण्णा काकडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष विशाल तांबे,निलेश निकम, प्रदीप गायकवाड, प्रदीप देशमुख,पुणे शहर महिला अध्यक्षा मृणालिनी वाणी, युवक शहराध्यक्ष किशोर कांबळे, कार्याध्यक्ष अजिंक्य पालकर , कसबा विधानसभा अध्यक्ष गणेश नलावडे, स्वाती पोकळे, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Read also:
- राष्ट्रवादी -भाजप युतीच्या चर्चेला जोर; प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यक्रमाला भाजपच्या मुख्यमंत्र्यांची हजेरी
- “हिरवा अन् भगव्याच्या वादामध्ये मला रंग नसलेला भोंगा हवाय”; अमोल कोल्हेंच्या ‘या’ दमदार भाषणाची चर्चा
- “औरंगजेबाला याच मातीत गाडलं होतं, जे भक्त आहेत त्यांना..;” राऊतांचा अकबरूद्दीन ओवेसीला इशारा
- “नानांना अजून सवय नाही का? काकांच्या खंजीरांनी वंसतदादा, राजीव गांधी, सोनियाजी घायळ झालेत”
- फक्त पोलिसांना 10 मिनिटे बाजूला करा…याला औरंगजेबाकडे..; नितेश राणेंचा ओवेसीला सज्जड दम