बीड : राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी एक पाऊल मागे घेतल्याने भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा फायदा झाला आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर पुन्हा एकदा मुंडे पॅनलने वचर्स्व राखलं आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणुक बिनविरोध होऊन पंकजा मुंडे यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी धनंजय मुंडे गटाचे चंद्रकांत कराड यांची निवड झाली आहे.
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली
वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाऊ धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतला. या निवडणुकीत मुंडे भाऊ-बहिणीनी युती केल्याने ही निवडणुक बिनविरोध झाली. या निवडणुकीत धनंजय मुंडे गटाचे १० तर पंकजा मुंडे यांचे ११ उमेदवार निवडून आले होते. एकूण २१ जागांसाठी ही निवडणुकीत अलिकडेच पार पडली होती.
हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष
दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या हाती वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा पुन्हा देण्यात आला तर आज सकाळी ११ वाजता चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी विशेष सभा बोलवण्यात आली होती. या सभेत चेअरमनपदासाठी पंकजा मुंडे यांचा एकमताने अर्ज आल्यानंतर त्यांची निवड घोषित करण्यात आली तर धनंजय मुंडे यांच्या गटाचे चंद्रकांत कराड यांची व्हाईस चेअरमन पदी निवड करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“९९ टक्के लोक मलाही मुख्यमंत्री करू इच्छीतात”, त्या सर्व्हेवर आव्हाडांची प्रतिक्रिया
हेही वाचा…२० जून जागतिक “गद्दार दिन” साजरा करा, ठाकरे गटाची थेट युनोकडे पत्राद्वारे मागणी
हेही वाचा…अंबादास दानवेंचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेते पद जाणार, ठाकरेंना आता राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस धक्का देणार ?
हेही वाचा…राज्यात आता निवडणुका झाल्या तर कोण मुख्यमंत्री, कुणाची सत्ता ? एका सर्व्हेमध्ये धक्कादायक माहिती समोर
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”