मुंबई : ठाकरे गटातील विधान परिषदेच्या आक्रमक आमदार मनिषा कायंदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. याचा मोठा धक्का माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बसला आहे. यातच आता मनिषा कायंदे यांच्या जाण्याने विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदही ठाकरेंकडून जाणार असून यासाठी आता राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
सध्या विधानपरिषदेत भाजपचे १९ तर राष्ट्रवादी, काॅंग्रेस आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रत्येकी १२ आमदार आहेत. मात्र आता मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंकडे ११ आमदार शिल्लक राहिले आहेत. यातच आता सर्वात जास्त ज्यांचे आमदार त्यांच्याकडे विरोधी पक्षनेते पद असा महाविकास आघाडीत ठरलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंकडून हे पद राष्ट्रवादी किंवा काॅंग्रेसकडे जाणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…ठाकरेंना मोठा धक्का.! शिवसेनेच्या आक्रमक महिला आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
यातच आता शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील आमदारांची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीसाठी अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आता याबाबत देखील चर्चा केली जाणार का? अशी शक्यता देखील आता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…*ते माझे पाप…मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कितीदा घर सोडलं,” नारायण राणेंचा गौप्यस्फोट*
दरम्यान, ठाकरेंकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते गेले, तर राष्ट्रवादीकडून आमदार एकनाथ खडसे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पद दिलं जाणार आहे? अशीही चर्चा दुसऱ्या बाजूला राजकीय वर्तुळात चर्चेली जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष
हेही वाचा…शिंदेंच्या बंडला एक वर्ष पुर्ण, ‘NCP’ गद्दार दिवस आंदोलन साजरा करणार, घोषणांही ठरल्या
हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचे तिखट वार, देवेंद्र फडणवीसांचे पलटवार,” ठाकरे अन् फडणवीसांमुळे राजकारण तापलं
हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास