मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागच्या २० जून रोजी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याला आता वर्षपुर्ती होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीकडून २० जून रोजी खोकेवीरांच्या वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस आंदोलन राज्यभरात राबवावे असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांनी केले आहे.
हेही वाचा…*ते माझे पाप…मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कितीदा घर सोडलं,” नारायण राणेंचा गौप्यस्फोट*
महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला येत्या २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खोकेवीरांच्या वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस आंदोलन राज्यभरात राबवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश या निषेध आंदोलनातून द्यायचा आहे. असंही पाटलांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आम्ही स्वाभिमानी मराठी, गद्दार पाठवू गुहाटी, चले जाव चले जाव, गद्दार गुहाटी चले जाव, महाराष्ट्र त्रस्त, खोके घेऊन गद्दार मस्त, पन्नास खोके, माजलेत बोके, गद्दार हटाव, महाराष्ट्र बचाव, महाराष्ट्रातून गद्दार होणार हद्दपार, खोके सरकारचा चालणार नाही थाट, गद्दारांना दाखवू कात्रजचा घाट, पन्नास खोके, गद्दार नॉट ओके, खोके सरकार हाय हाय, गद्दारांना इथे जागा नाय, अशा गद्दारांविरोधात विविध घोषणा देऊन अख्या महाराष्ट्र दुमदुमून टाका असही जयंत पाटलांनी म्हटलं आहे.
खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘गद्दार दिवस’ आंदोलन राज्यभरात राबवावे
मा. प्रदेशाध्यक्ष @Jayant_R_Patil यांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहनशिंदे गटाने महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला येत्या २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खोकेवीरांच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘गद्दार दिवस’…
— NCP (@NCPspeaks) June 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचे तिखट वार, देवेंद्र फडणवीसांचे पलटवार,” ठाकरे अन् फडणवीसांमुळे राजकारण तापलं
हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
हेही वाचा…ठाकरेंना मोठा धक्का.! शिवसेनेच्या आक्रमक महिला आमदाराचा शिंदे गटात प्रवेश