मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड पुकाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनेक कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी साथ सोडली. यातच आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेच्या आमदार आणि शिवसेनेच्या आक्रमक नेत्या मनिषा कायंदे यांनी ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. मनिषा कायंदे यांच्यासह अनेक नगरसेवकांनीही शिंदेंच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे हा ठाकरेंना मोठा धक्का मानला जात आहे.
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. याप्रसंगी मनिषा कायंदे यांचे पक्षात स्वागत करून भावी कारकिर्दीकरता शुभेच्छा देत त्यांची शिवसेना सचिव आणि प्रक्षप्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका महिलेला पक्षाच्या सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली असून पक्षाचा विस्तार करण्यासाठी तसेच महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा यावेळी मनिषा कायदं यांच्याकडे व्यक्त केली. असं एकनाथ शिंदे यांनी ट्विट केलं आहे.
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
तसेच पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, मुंबईतील चुनाभट्टी भागातील माजी अपत्र नगरसेवक विजय तांडेल, त्यांची पत्नी सान्वी विजय तांडेल यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी या सर्वांचे पुप्षगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. तसेच त्यांच्या भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह चुनाभट्टी भागातील असंख्य कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. असंही शिंदेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
दरम्यान, मनिषा कायंदे यांनी भाजपमधून राजकीय कारकिर्दीला सुरूवात केली. त्यांनी भाजपमध्ये जवळपास २५ ते ३० वर्ष काम केले. मनिषा कायंदे यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकीटावर विधानसभेची निवडणुक लढविली होती. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभावाचा सामाना करावा लागला होता. त्यानंतर २०१२ मध्ये भाजपला रामराम ठोकून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ साली मनिषा कायंदे यांना शिवसेनेत प्रवक्तेपदी म्हणून नेमणुक केली. तर २०१८ साली उद्धव ठाकरे यांनी मनिषा कायंदे यांना विधान परिषदेत आमदार म्हणून पाठवलं. ११ वर्ष पालिकेच्या शिक्षण समितीवर मनिषा कायंदे यांनी काम केलं. ठाकरे गटाच्या महिला नेत्यांपैकी त्या प्रमुख होत्या. महिलांसाठी अवनी या संस्थेमार्फत स्त्री शक्ती केंद्रांचं काम केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
हेही वाचा…ठाकरेंना मोठा धक्का.! शिवसेनेच्या आक्रमक महिला आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…*ते माझे पाप…मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कितीदा घर सोडलं,” नारायण राणेंचा गौप्यस्फोट*
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती