मुंबई : शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यात काल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली. ज्यांना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणत ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलेले दिसून आलं.
हेही वाचा…“खरी शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, दुसरी जत्रेतील खोटी सेना “
देवेंद्र फडणवीस तुमची परिस्थिती फार हलाखीची आहे. तुम्ही जे बोलताय, ते ठिक आहे. पण सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, याचं उत्तम उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस. कारण त्यांचा होणारा अपमान त्यांंना सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. कारण वरून आदेश आला आहे. देवेंद्र फडणवीस, तुम्ही जर खरे सावकरप्रेमी असाल, तर आपल्या देशाला स्वत: च्या बुडाखाली घेणाऱ्या तुमच्या नेत्यांचा धिक्कार करा. हिमंत असेल तर करून दाखवा, असं आवाहन ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं. तसेच देशाचं स्वातत्रं आणि देशाची लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आम्ही भाजप व्यतिरिक्त इतर पक्ष एकत्र येतोय असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…राज्यातील काॅंग्रेसच्या ‘दिल्ली वाऱ्या’ वाढल्या, नाना पटोलेंच्या प्रदेशाध्यक्ष पदाला मोठा धक्का
कर्नाटक सरकारने सावरकरांचा धडा वगळला आहे, याचा शिवसेना निषेध करतेच. सावरकरांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यसाठी कष्ट भोगले, म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. सावरकरांनी कष्ट करून, मरण यातना भोगून जो देश स्वातंत्र्य केला, तो देश ज्याचा स्वातंत्र्यसंग्रामात काडीचाही संबंध नव्हता, अशी एखादी विचारधारा तिच्या जोखडाखाली आणू इच्छिते आहे, यावर तुमचं मत काय? सावरकरांनी मोदी आणि फडणवीसांसाठी कष्ट आणि हालअपेष्टा भोगल्या होत्या का असा सवालही ठाकरेंनी केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंना मोठा धक्का.! शिवसेनेच्या आक्रमक महिला आमदाराचा शिंदे गटात प्रवेश
हेही वाचा…*ते माझे पाप…मला पक्षातून काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कितीदा घर सोडलं,” नारायण राणेंचा गौप्यस्फोट*
हेही वाचा…“राष्ट्र उभारणीत महत्वाचा आधार देणाऱ्या कंपन्यांना मोदी सरकार का उद्ध्वस्त करत आहे?”
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या घरासमोरच रिक्षाचालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, रिक्षाचालक शिवसैनिक असल्याची माहिती
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब आपल्या राज्यात घडतंय काय? जयंत पाटलांचं थेट शिंदेंना पत्र