मुंबई : शिवसेनेचा २० जून रोजी वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. त्याआधी शिंदे गटाने हा दिवस जागतिक गद्दार दिवस साजरा केला पाहिजे. असं ठाकरे गटाच्या नेत्यांकडू डिवचण्यात आलं आहे. तसेच उद्या ठाकरे आणि शिंदे गटाकडून वर्धापन दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आलं आहे. यासाठी राज्यातून अनेक शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे. यातच उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना बाजूला करावं, आम्ही पुन्हा शिवसेना उभी करू असं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास
खऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत संजय राऊतांनी गद्दारी केली आहे. त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना विनंती करतो की, संजय राऊत या नावाच्या माणसाला बाजूला करा, पुन्हा एकदा तीच शिवसेना तुम्हाला दिसेल, असं अजय बोरस्ते यांनी म्हटलं आहे. यातच उद्याच्या वर्धापन दिनानिमित्ताने हजारोच्या संख्येने शिवसैनिक नाशिकमधून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे.
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जून रोजीच शिवसेनेविरोधात बंड पुकारलं होतं. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राशी केलेल्या गद्दारीला येत्या २० जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. खोकेवीरांच्या वर्षपुर्तीनिमित्त गद्दार दिवस आंदोलन राज्यभरात राबवावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे. खोक्यांचे राजकारण करून धोक्याने सत्ता बळकावलेल्या गद्दारांची सत्तेतून पायउतार व्हायची वेळ आली असल्याचा संदेश या निषेध आंदोलनातून द्यायचा आहे. असंही पाटलांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली
हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष
हेही वाचा…शिंदेंच्या बंडला एक वर्ष पुर्ण, ‘NCP’ गद्दार दिवस आंदोलन साजरा करणार, घोषणांही ठरल्या
हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचे तिखट वार, देवेंद्र फडणवीसांचे पलटवार,” ठाकरे अन् फडणवीसांमुळे राजकारण तापलं