मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आता एक वर्ष पुर्ण होत आहे. महाविकास आघाडी सरकार पाडून शिंदेंनी भाजपसोबत युती स्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज्यातील राजकीय गणितं सगळी बदललीत. यातच आता जर निवडणुका घेतल्या तर कोणाची सत्ता स्थापन होणार, कोण मुख्यमंत्री होणार याचा सर्व्हे करण्यात आला आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंचे तिखट वार, देवेंद्र फडणवीसांचे पलटवार,” ठाकरे अन् फडणवीसांमुळे राजकारण तापलं
न्यूज अरेने राज्याती विधानसभा निवडणुकीचा सर्वेक्षण केले असून यामध्ये भाजपचा सर्वात जास्त १२३ ते १२९ जागा मिळणाल असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या स्थानी शिंदे गट ५५, राष्ट्रवादी ५५-५६ काॅंग्रेसला ५०-५३ तर शिवसेना उबाठा गटाला १७ ते १९ जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर १२ जागा अपक्षांना मिळतील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा…“भाजपच्या नेत्या, ते शिवसेनेच्या आक्रमक आमदार,” वाचा मनिषा कायंदेंचा राजकीय प्रवास
यामध्ये कथित सर्व्हेनुसार सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना 35 टक्के मुख्यमंत्रीपदासाठी सर्वात जास्त पंसती देण्यात आली आहे. फडणवीसांच्या खालोखाल काॅंग्रेसचे अशोक चव्हाण, २१ टक्के, विरोधी पक्षनेते अजित पवार यांना १४ टक्के, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना १२ तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ९ टक्के मतदारांची पसंती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
हेही वाचा…““देवेंद्र फडणवीसजी…!, जर हिमंत असेल तर..,”” उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना दिलं आवाहन
दरम्यान, न्यूज अरेने हे सर्व सर्व्हे ट्विटवर ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी काही निष्कर्ष देखील मांडले आहेत. यात आगामी निवडणुकीत भाजपला आजवरच्या सर्वाधिक जागा, तसेच मतदानाची वेळ जसजशी जवळ येईल तोपर्यंत अपक्ष किंवा इतर उमेदवारांचा आकडा वाढू शकतो. असं निरिक्षण मांडण्यात आलं आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त जागा, यात कोकणातून नाहीतर संपुर्ण महारातून उमेदवार निवडून येतील असही सांगण्यात आलं आहे.
Maharashtra Assembly Prediction as on date –
BJP : 123-129
SS : 25
NCP : 55-56
INC : 50-53
SS(UBT) : 17-19
OTH : 12Findings –
➡️ BJP will reach its highest ever tally in Maharashtra.
➡️ No of Others will go up as voting day will approach.
➡️ Eknath Shinde’s Shiv Sena will… pic.twitter.com/zePs0kYqmu
— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“उद्धव साहेब, तुम्ही फक्त संजय राऊतांना बाजूला करा, तीच शिवसेना उभी करू”
हेही वाचा…ठाकरेंना धक्का देत विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर NCP अन् काॅंग्रेसमध्ये चुरस, तातडीची बैठक बोलवली
हेही वाचा…बीआरएसची महाराष्ट्रात “हायटेक” रणनीती, सोशल मीडियाच्या माध्यमातून घराघरात पोहोचला BRS पक्ष
हेही वाचा…शिंदेंच्या बंडला एक वर्ष पुर्ण, ‘NCP’ गद्दार दिवस आंदोलन साजरा करणार, घोषणांही ठरल्या
हेही वाचा…“कोणाच्या बापाचा बाप जरी जमिनीवर उतरला तरी…,” देवेंद्र फडणवीसांनी दिला विरोधकांना इशारा