पुणे : काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे शहराचा दौरा केला. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्व होते. भाजपची सत्ता असणारी पुणे महानगरपालिका पुन्हा एकदा ताब्यात घेण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडले आहे. यामुळेच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नरेंद्र मोदी यांना मेट्रोच्या उदघाटनाचे निमंत्रण दिले होते.
नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा अत्यंत भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या महाराष्ट्रातील दिग्ग्ज पदाधिकारी, आमदारांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली होती. महाविकास आघाडी सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची देखील कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.
विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
पुणे मेट्रोचे उदघाटन होत असताना पुणे महानगरपालिकेतील प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीने मोदींना काळे झेंडे दाखवत मूक मोर्चाचे आयोजन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मेट्रोमधून प्रवास करत असताना त्या मार्गाच्या बाजूला थांबून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. कोणी काळे, निळे, पिवळे कोणतेही झेंडे दाखवू दे. जनता बघते, ते फक्त स्वतःचं अस्तित्व दाखविण्यासाठी हे करतायेत असा टोला त्यांनी राष्ट्रवादीला हाणला आहे.
विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार
एखादं चांगलं काम करून श्रेय घ्या, पण कामं करायची नाहीत आणि दुसऱ्यांसमोर निदर्शन करायची. देव त्यांना सुदबुद्धी देवो. तसेच अण्णा साहेब पाटलांच्या आणि अटल बिहारी वाजपेयींच्या नावाच्या उद्याना समोर आंदोलन करण्याची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडली. मला या दोन्ही पक्षाच्या नेत्यांची आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बुद्धीची कीव येते, हे दुर्दैव्य आहे, असेही ते म्हणाले आहेत.
Read also:
- विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अजितदादांचं राज्यपालांना साकडं; कोश्यारी निर्णय घेणार?
- मनोज कटके हल्ला प्रकरण; देवेंद्र फडणवीसांचा पोलिसांना इशारा, म्हणाले…
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याला राष्ट्रवादी करणार जोरदार विरोध; विराट मूक मोर्चाचे आयोजन
- नवाब मालिक राजीनामा द्या; विधानसभेच्या आवारात भाजपकडून स्वाक्षरी मोहीम
- विधानसभा अध्यक्षीय निवडणूक 9 मार्चला प्रस्तापित; त्या 12 आमदारांचा देखील प्रश्न सुटणार