पुणे : कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत आता मोठी रंगत बघायला मिळत आहे. ह्या दोन्ही ठिकाणी निवडणुक लढविण्याचे संकेत राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. ह्या दोन्ही पोटनिवडणुक लढविण्याचा आग्रह कार्यकर्त्यांचा असून याबाबत सर्व एकत्रित विचार निर्णय घेतला जाईल. असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
“बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेला सुरूवात, न्याय मागणीला आपल्या सरकारने होकार द्यावा”; जितेंद्र आव्हाड
पिंपरी चिंचवड येथील कार्यकर्त्यांनी माझी भेट घेऊन पोटनिवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते शरद पवार यांचीही भेट घेणार आहे. अशा पद्धतीच्या ज्यावेळी निवडणुका लागतात त्यावेळी सगळ्यांशी एकत्रित चर्चा होतोय. त्यासाठी आम्ही 22 ते 23 तारखेला मुंबईत एकत्रित येणार आहोत. त्यावेळी आम्ही या निवडणुकीबाबत निर्णय घेऊ असंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.
चला आता पुन्हा कामाला लागा..! पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस
तसेच पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप आणि अश्विनी जगताप यांची नावं वरती कळवली आहेत. तसेच कसब्यात देखील विविध उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर देखील आम्ही सर्व एकत्रित चर्चा करून निर्णय घेऊ असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. यातच कसब्यातून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. परंतु अद्यापही दोन्ही ठिकाणी कोणत्याही उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही.
Read also
- बल इंजिनंच सरकार विरोधकांना धडकी भरवणार..!
- अमृता फडणवीसांच्या ‘त्या’ कृतीवर राष्ट्रवादीचा आक्षेप..! थेट फडणवीसांच्या बंगल्यात…
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
- राष्ट्रवादी, काॅंग्रेस, ठाकरे गट, अन् वचिंतचे कार्यकर्ते फोडले, शिंदेंच्या उपस्थितीत महाप्रवेश
- “लक्ष्मण जगतापांबाबत लोकांमध्ये मोठी सहानुभूती”, चिंचवडची निवडणुक बिनविरोध व्हावी, राष्ट्रवादीची भूमिका