मुंबई : जुन्या निवृत्तीवेतनासह अन्य मागण्यांसाठी शासकीय, निमशासकीय, जिल्हा परिषद, महापालिका, शिक्षक संघटनांनी मंगळवारपासून बेमुदत संपाला सुरूवात केल्यावर जनतेचे हाल सुरू झाले असून बहुतांश शासकीय सेवा ठप्प झाल्या आहेत. काही महापालिकांमध्ये अधिकारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून कामकाज सुरळीत ठेवण्याचे प्रयत्न सुरु असले तरी जिल्हा परिषदा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अनुदानित शाळा-महाविद्यालये, उपप्रादेशिक परिवहन कार्यालये आणि अनेक शासकीय रुग्णालयांमधील आंतररुग्ण सेवेचाही बोजवारा उडाला आहे. तर या संपात तांबे पिता पुत्रानेही सहभाग घेतला आहे.
हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं
जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठींबा देण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी विधान परिषदेच्या कामावर बहिष्कार टाकून मुंबईत आंदोलनात सहभागी झाले आहेत. तर दुसरीकडे माजी आमदार सुधीर तांबे यांनी संगमनेरमध्ये आंदोलनात भाग घेतला आहे.
हेही वाचा..“कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर…” भुषण देसाईंच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंची खोचक टिका
प्रचंड आर्थिक बोजामुळे जुन्या निवृत्तीवेतन योजनेची मागणी मान्य करणे अशक्य असले तरी शिक्षक आणि अन्य कर्मचारी संघटनांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर तोडग्यासाठी चर्चा सुरु आहे.
Read also
- “जर बहुसंख्य आमदारांनी पाठिंबा काढला असेल, तर..” कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
- हेही वाचा..“सदानंद कदम यांना अनिल परब यांनीच बळीचा बकरा बनवला”, रामदास कदम
- हेही वाचा…अनिल परब यांना ‘त्या’ प्रकरणात मोठा दिलासा, सोमवार पर्यंत सुरक्षा दिली
- हेही वाचा…शिवसेनेचा कट्टर शिवसैनिक भाजपच्या गळ्याला, फडणवीसांच्या उपस्थित भाजपमध्ये पक्षप्रवेश
- हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला