मुंबई : शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही उपस्थित होते. तसेच हिंदूत्व सोडून उद्धव ठाकरे यांच्याकडून संघावर टिका असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…” २० लाख कर्मचारी संपावर, सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी “? अजित पवार
अलिकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मांडणी केलेल्या हिंदुत्वाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आक्रमक दिशा दिली. मात्र संघावर अकारण राजकीय टीका करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही दिशा भरकटवली. संघाला राजकीय वादामध्ये प्रत्यक्ष ओढून शिवसेनेने काॅंग्रेसची री ओढली आहे, अशा शब्दात नाराजी व्यक्त करत श्याम देशपांडे यांनी शिवसेनेतील काम थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली.
हेही वाचा..“भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?” भाजपचा सवाल
श्याम देशापांडे मुळचे आपलेच आहे. तसे ते शिवसेनेत होते. ते अतिशय कट्टर शिवसैनिक होते. परंतु जेव्हा पासून उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्व सोडलं. तशापासून त्यांचे सारखे सच्चे शिवसैनिक नाराज झाले. तसेच संघावर टिका करण्याचं काम तेव्हा महाराष्ट्रातील पहिला माणूस म्हणून श्याम देशपांडे होते, की संघावर टिका होत असेल तर मी थांबू शकत नाही. कारण हिंदुत्व वादावर टिका होत असेल तर त्या पक्षात राहायचं नाही. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.
Read also
- हेही वाचा…“रखरत्या उन्हातून चालत आंदोलक शेतकरी मुंबईच्या वेशीवर,” अजित पवारांनी मुद्दा उचलला
- हेही वाचा..एकनाथ शिंदेंच्या दोन्ही वकिलांच्या युक्तिवादात विसंगती, कोर्टाने वकिलांना सुनावलं
- हेही वाचा..“कुणाला वॉशिंग मशिनमध्ये उडी मारायची असेल, तर…” भुषण देसाईंच्या पक्ष प्रवेशावर आदित्य ठाकरेंची खोचक टिका
- हेही वाचा…महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आंतरराष्ट्रीय नजर, केनियाच्या सरन्यायाधीश कोर्टात हजर
- हेही वाचा…“गोखले यांना अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली” राऊतांचा सोमय्या,फडणवीसांवर निशाणा