मुंबई : जूनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सरकारचा प्रस्ताव धुडकावत आज कर्माचाऱ्यांनी संपुर्ण राज्यात संप पुकारला आहे. राज्य शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकार-निमसरकारी, जिल्हा परिषदा, शासनाचे अनुदान घेणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, शिक्षक व शिक्षकेतर असे १७ लाख कर्मचारी या संपात सहभागी होणार आहेत. यावर विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी भाष्य केलं आहे.
हेही वाचा..राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?
जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. त्यामुळे आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून विधानसभेत केली.
हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत आमची जुन्या पेंशन योजनेसाठी बैठक झाली. यात तोडगा काढण्याचा प्रयत्न सरकारने केला. परंतु जुन्या पेन्शन योजनेसाठी शासकीय कर्मचार्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्याचा परिणाम अत्यावश्यक सेवेवर झाला आहे. अत्यावश्यक सेवा बर्याच ठिकाणी बंद आहे. संघटनेसोबत चर्चा केली मात्र त्यातून मार्ग निघालेला नाही याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. काम बंद आंदोलन मागे घेण्यासाठी सरकार करत असलेले प्रयत्न आणि जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत सरकारची काय भूमिका आहे याबाबत सरकारला निवेदन करण्यास सूचना करावी अशी मागणीही अजित पवार यांनी अध्यक्षांकडे केली.
Read also
- हेही वाचा..“भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?” भाजपचा सवाल
- हेही वाचा..राज्यभरात 20 लाख कर्मचारी संपावर, राज्याचा कारभार कोलमडणार
- हेही वाचा…हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, सुनावणी सुरू
- हेही वाचा…सत्तासंघर्षावरील अंतिम सुनावणी..! असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, हरीश साळवेंचा कोर्टात युक्तिवाद
- हेही वाचा…“कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप,” म्हात्रे-सुर्वे प्रकरणावर, आव्हाडांचा खोचक टोला