पुणे : अप्पासाहेब नलावडे साखर कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ अडचणीत सापडले आहेत. अलिकडेच्या दिवशी इडीच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफांच्या घरावर धाड टाकली. जवळपास साडे नऊ तास तपास केल्यानंतर इडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरातून बाहेर पडले. या प्रकरणावर आता हसन मुश्रीफांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे.
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं
हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह यांनी हायकोर्टात माहिती दिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, ईडीच्या प्रकरणात हसन मुश्रीफांना आरोपी बनवलेलं नाही. सध्या प्राथमिक तपास सुरू आहे. त्यांच्या तिन्ही मुलांनी यात सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीन अर्ज केलेला आहे. जर त्यांनाही अटकेची भिती असेल तर त्यांनीही रितसर अटकपुर्व जामीन अर्ज करावा. असं सिंह यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले
दरम्यान, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते, माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईने संतप्त झालेल्या एका मुश्रीफ समर्थकाने सीआरपीएफ जवानांच्या समोर जमिनीवर डोके आपटून घेतल्याने तो जखमी झाला. सागर दावणे असे त्याचे नाव आहे. जखमीच उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर मुश्रीफांच्या निवासस्थानासमोर शेकडो कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे.
Read also
- हेही वाचा…सत्तासंघर्षावरील अंतिम सुनावणी..! असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, हरीश साळवेंचा कोर्टात युक्तिवाद
- हेही वाचा…“कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप,” म्हात्रे-सुर्वे प्रकरणावर, आव्हाडांचा खोचक टोला
- हेही वाचा..राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?
- हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
- हेही वाचा…जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला, २० लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, बैठक निष्फळ