मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सध्या मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे. तसंच दहिसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे. तर या प्रकरणात अनेक तरूणांना अटक करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टिका केली आहे.
हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं
जितेंद्र आव्हाड म्हणाले की, म्हात्रे- सुर्वे प्रकरणात महाराष्ट्रात पोलिसांना सुरू केलेलं अटकसत्र काही संपताना दिसत नाही. समाजमाध्यमांवर प्रभावी असणाऱ्या मुलांना टार्गेट केले जात आहे. समाजमाध्यमांवर शिंदे गटाला न मिळणारा पाठिंबा हे त्याचे प्रमुख कारण आहे, ही पोरं पैसे घेऊन नाही, तर आपलं ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासाठी व्यक्त होतं असतात. अशा पोरांना अडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याचे काम सरकार करीत असल्याचा आरोपही त्यांनी लावला.
हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
तसेच, तुम्ही लोकांच मनं जिंकू शकालं किंवा दादागिरींनी त्यांना शांत बसवू शकालं ते कदापि शक्य नाही. कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप, कार्यकर्ते असे घाबरून घरी बसत नसतात. सर्वोच्च न्यायालयाने असल्या अटकांविरूद्ध निरीक्षण नोंदवले आहे. पोलिसांना राजकीय कार्यकर्ते म्हणून वागू नये, माझा नग्र फोटो टाकणाऱ्याला आजही अटक केली नाही, करोडो रूपये फिस असणारे वकील सर्वोच्च न्यायालयात त्याच्यामागे उभे केले जातात. यासाठी ठाण्यातून त्याच्या मागे कोण होते , हे मी सांगायला नको, त्याला आजपर्यंत अटक नाही . उलट मला कसे गुंतवता येईल ह्यासाठी जिवाचे रान करत असल्याचंही आव्हाडांनी सांगितलं.
म्हात्रे-सुर्वे प्रकरणात महाराष्ट्रात पोलिसांनी सुरु केलेलं अटकसत्र काही संपताना दिसत नाही. समाजमाध्यमांवर प्रभावी असणाऱ्या मुलांना टारगेट केले जात आहे. समाजमाध्यमांवर शिंदे गटाला न मिळणारा पाठिंबा हे त्याचे प्रमुख कारण आहे. ही पोरं पैसे घेऊन नाही, तर आपलं ज्याच्यावर प्रेम आहे… https://t.co/qphPqHAz5z
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) March 13, 2023
Read also
- हेही वाचा..राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?
- हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
- हेही वाचा…जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला, २० लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, बैठक निष्फळ
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं
- हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले