कोल्हापूर : आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कार्यकर्ते पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी रामराम ठोकत ठाकरेंची साथ सोडली. तर काल ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भुषण देसाई यांनी देखील ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यातच आता एक बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.
हेही वाचा..वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कृषीमंत्र्यांच्या विरूद्ध कडक कारवाई करण्याचे धाडस कराल का ?
माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह कुपेकर हे आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबईत मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
हेही वाचा…“जुन्या पेन्शनसंदर्भात सरकार तातडीने निर्णय घेणार नाही, २० लाख संपकरी संपाच्या वाटेवर”?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंदगड विधानसभा संघटक आणि उपजिल्हाप्रमुख संग्रामसिंह हे विधानसभेचे माजी सभापती बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे आहेत. मुळचे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असणारे कुपेकर यांनी चंदगड पंचायच समितीचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रतिनिधीत्व केले आहेत. तर जिल्हा परिषदेत बांधकाम व आरोग्य सभापती म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
Read also
- हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
- हेही वाचा…जुन्या पेन्शनचा मुद्दा तापला, २० लाख कर्मचारी उद्यापासून संपावर, बैठक निष्फळ
- हेही वाचा…आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीयाला अटक, शीतल म्हात्रे प्रकरणाची SIT मार्फत चौकशी, प्रकरण चिघळलं
- हेही वाचा…“दुध का दुध, पाणी का पाणी झालं पाहिजे,” शीतल म्हात्रेंच्या व्हिडीओवरून अजित पवार संतापले
- हेही वाचा..बच्चू कडूंना अटक करा, आसामच्या विधानसभेत मागणी, विरोधक आक्रमक, ‘ते’ वक्तव्य भोवलं