मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसापासून विरोधकांवर ईडीच्या कारवाया होतांना दिसत आहे. त्याचसोबत देशात देखील विरोधी पक्षातील नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणाचा ससेमिरा पाठीमागे लागला आहे. यातच तृणमूल काॅंग्रेसचे नेते साकेत गोखले यांना ईडीने अटक केली आहे. यावरून संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“कोणाचं पाप आणि पोरांच्या डोक्याला ताप,” म्हात्रे-सुर्वे प्रकरणावर, आव्हाडांचा खोचक टोला
संजय राऊतांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, क्राऊड फडींगच्या प्रकरणात तृणमूलच्या साकेत गोखले यांना ईडीने अटक केली आहे. गोखले तुरूंगात आहे. किरीट सोमय्य यांनी सेव्ह विक्रांत च्या नावाखाली क्राऊड फडींग करून अपहार केला. फडणवीस सरकारने त्याला क्लिन चीट दिली. गोखलेच अटक करणारी ईडी विक्रांत घोटाळ्यात चुप राहिली. असं म्हणत त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केलेत.
हेही वाचा..राज्यात भाजपमध्ये पुन्हा “लोटस कमळ” सक्रीय, राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये जाणार ?
गोखले यांना अहमदाबादमध्ये मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या ( पीएमएलए ) फौजदारी कलमांतर्गत ताब्यात घेण्यात आले होते, जिथे गुजरात पोलिसांच्या खटल्याच्या संदर्भात त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. त्यावर फेडरल एजन्सी त्याला आठवण करून देण्यासाठी स्थानिक न्यायालयात हजर करेल.
हेही वाचा..ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांचे पुत्र एकनाथ शिंदे सोबत, भुषण देसाईंचा पक्ष प्रवेश
क्राउड फंडिंगच्या माध्यमातून जमवलेल्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी गुजरात पोलिसांनी गोखले यांना २९ डिसेंबर रोजी दिल्लीतून अटक केली होती. डिसेंबरच्या सुरुवातीला, पूल कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरबी दौऱ्यावर झालेल्या खर्चाविषयी खोट्या बातम्या पसरवल्याबद्दल गुजरात पोलिसांनी त्याला दोनदा अटक केली.
Crowd funding प्रकरणात तृणमूल च्या साकेत गोखले यांना Ed ने अटक केली.गोखले तुरुंगात आहे.
किरीट सोमय्या यांनी save vikrant चया नावाखाली crowd funding करुन अपहार केला.
फडणवीस सरकारने त्याला clean cheat दिली.
गोखलेस अटक करणारी ed विक्रांत घोटाळ्यात चूप राहिली.
असत्यमेव जयते!@dir_ed pic.twitter.com/xCOnPt2gM5— Sanjay Raut (@rautsanjay61) March 14, 2023
Read also
- हेही वाचा…” २० लाख कर्मचारी संपावर, सरकारने आपली भुमिका स्पष्ट करावी “? अजित पवार
- हेही वाचा..“भाजप-युतीचे सरकार येताच मोर्चे निघतात कसे? यामागचा बोलविता अन करविता धनी कोण ?” भाजपचा सवाल
- हेही वाचा..राज्यभरात 20 लाख कर्मचारी संपावर, राज्याचा कारभार कोलमडणार
- हेही वाचा…हसन मुश्रीफांची ईडीच्या कारवाईविरोधात हायकोर्टात याचिका दाखल, सुनावणी सुरू
- हेही वाचा…सत्तासंघर्षावरील अंतिम सुनावणी..! असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य, हरीश साळवेंचा कोर्टात युक्तिवाद