मुंबई : मुंबईत आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी पाचोरा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, सभापती, माजी सरपंच दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांच्या कन्या वैशाली सुर्यवंशी यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यासह शिंदे आणि भाजपमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधलं. त्यावेळी ठाकरेंनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा….माढा लोकसभा मतदारसंघात हाय व्होल्टेज ड्रामा ; राष्ट्रवादीच्या संजीवराजे नाईक निंबाळकरांनी घेतली विजयसिंह मोहिते पाटलांची भेट
सत्तेला घाबरणार असाल तर काही उपयोग नाही. ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही. ती सत्ता बदललीच पाहिजे. त्या जिद्दीने मी उभा आहे. सत्ता ही सर्वांना आपली वाटली पाहिजे. ज्या सत्तेची भीती वाटत असेल तर ती उलथवलीच पाहिजे. त्यासाठी आपण काम करत आहोत. त्या कामात तुम्ही सर्व सहभागी होत आहात. त्याचं मी स्वागत करतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी पाचोरा विधानसभेतील शिंदे गट आणि भाजपमधील कार्यकर्त्यांचं पक्षात स्वागत केलं.
हेही वाचा…फडणवीसांनंतर शिंदेंनीही लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकलं, ६ जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा, पहिल्या सभेचं ठिकाण ठरलं
दरम्यान, आपल्याकडे पक्ष नाही, चिन्हं नाही. पण आपल्याकडे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्याकडे पाहून लोकं येत आहे. इतर पक्षात प्रवेश सुरू आहेत असं दिसत नाही. फक्त ते आपल्याकडेच सुरू आहे. आपण सर्व जण उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी आलो आहोत. शिवसेना सत्तेवर लाथ मारते. सत्तेची पर्वा करत नाही. शिवसेना ही सत्ता आहे म्हणून कोणतेही निर्णय घेत नाही म्हणून ती शिवसेना आहे. अशा भावना यावेळी खासदार संजय राऊतांनी व्यक्त केल्या.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांनी मागितल्या १२ जागा ; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
हेही वाचा.“राऊतांची तुलना महाभारतातील मंथरेशी ;” भाजपच्या महिला नेत्याने राऊतांना खडसावलं
हेही वाचामोठी बातमी : कल्याण, ठाणे ते धाराशिव, हातकणंगले, नाशिक, संभाजीनगर ते रामटेक, बुलढाणा, ठाकरे गटाच्या 23 जागा ठरल्या!
हेही वाचा..“१० तारखेनंतर राज्यात नवा नवरदेव दिसेल ; तयारी सुरू झालीय,” विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
हेही वाचापुण्यापाठोपाठ नाशकातही महायुतीत मिठाचा खडा ; जिल्हा नियोजन समितीत अजित पवार गटाचा वरचष्मा