पुणे : पुण्यातील राजकारणाचा एकेकाळी केंद्रबिंदू असणारे काॅंग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी सध्या राजकारणात पुन्हा सक्रिय होताना दिसत आहेत. सुरशे कलमाडी यांच्या पुढाकाराने पुण्यात पुणे फेस्टिव्हचं आयोजन करण्यात आलं आहे. काॅंग्रेसपासून थोडे दुर गेलेले सुरेश कलमाडी यांच्या या कार्यक्रमात भाजपचे नेते हजेरी लावणार असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच सुरेश कलमाडी भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशापण चर्चा यानिमित्ताने उमटू लागल्या आहेत.
“राज ठाकरे हे प्रकरण शंभर टक्के गांभीर्याने घेतील”; किशोरी पेडणेकर
केंद्रीय वाहतुक मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहेत. तर या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. तसेच पुणे फेस्टिव्हच्या इतिहासात प्रथमच भाजपचे नेते उपस्थित राहणार असल्याने अनेकांना याचा धक्का बसला आहे.
“शिक्षक, पदवीधर मतदारसंघ रद्द करा”; प्रशांत बंब यांची मागणी
राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धा घोटाळ्यात सुरेश कलमाडी यांचं नाव समोर आल्यानंतर ते राजकारणापासून दुर गेले होते. त्यानंतर त्यांना काॅंग्रेसने देखील जवळ केले नाहीत. याच दरम्यान सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली होती. त्यावेळी ते पुन्हा राजकारणात सक्रिय झाल्याचे त्यांनी संकेत दिले. याचबरोबर आता पुणे फेस्टिव्हच्या कार्यक्रमाचे उद्घाटन काॅंग्रेस नेत्याच्या हस्ते करण्याची पंरपरा तोडून कलमाडी यांनी भाजपच्या नेत्यांना निमंत्रण दिलं आहे. यावरून आता कलमाडी भाजपशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
Read also
- ” भाजप करणार मिशन मुंबई महापालिकेचा शुभारंभ”; अमित शहा 5 सप्टेंबर रोजी मुंबईत
- “मिटकरींच्या विरोधातील सर्व पुरावे उघड करणार”; राष्ट्रवादीच्याच जिल्हाध्यक्षाचा मिटकरींना इशारा
- “शिंदे- फडणवीस सरकार म्हणजे इव्हेंट अन् इडीचं सरकार”; सुप्रिया सुळेंची टिका
- “मोदी सरकार हे भांडवलदारांचे, हे आता स्पष्टचं झालंय”; राष्ट्रवादीचा भाजपला खोचक टोला
- “तुमच्या सिंहासनाला कधी सुरूंग लागेल, हे कळणार देखील नाही”; अमोल मिटकरी